जळगाव (प्रतिनिधी) राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. सहा महिन्यानंतर जिल्हा परिषद, नगरपालिका व पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकासुध्दा जिल्हा बँकेप्रमाणे महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढण्याचा आमचा प्रयत्न राहणार असून, सर्व ठिकाणी महाविकास आघाडीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही. असा विश्वास पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला. ते लेवा भवनात आयोजित वधू-वर परिचय मेळाव्यानंतर पत्रकारांसोबत बोलत होते.
ना. पाटील पुढे म्हणाले की, महाविकास आघाडीने एकत्रपणे निवडणूक लढवत जिल्हा बँक ताब्यात घेतली. आगामी काळातही अशाच प्रकारे महाविकास आघाडी नगरपालिका, जिल्हा परिषद तसेच पंचायत समित्यांच्या निवडणुका एकत्रितपणे लढणार आहोत. आगामी काळात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस हे तीनही पक्ष महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढवतील का, हा प्रश्न सद्य:स्थितीत जरी अनुत्तरित असला तरी महाविकास आघाडी सर्वच शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी या तिघा पक्षांनी जिल्हा बँकेवर महाविकास विकास आघाडीचा झेंडा फडकाविला आहे. विजयानंतर महाविकास आघाडीतील तीनही पक्षांचे मनोबल वाढले आहे
















