जळगाव (प्रतिनिधी) येथील सरस्वती विद्या मंदिरात डॉ.राधाकृष्णन सर्वपल्ली यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना वसाने यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी शिक्षण सभापती रविंद्र पाटील यांच्या हस्ते प्रकाशन झालेले जिल्हास्तरीय ‘आपला जिल्हा आपले उपक्रम’ या डिजिटल ई-बुकमध्ये सुवर्णलता अडकमोल व सविता ठाकरे यांनी घेतलेला प्लास्टिक बंदी नैसर्गिक रंग निर्मिती या उपक्रमाची जिल्हास्तरीय डिजिटल बुकमध्ये दखल घेण्यात आली. याबद्दल मुख्याध्यापिका कल्पना वसाने यांच्या हस्ते शिक्षकदिनाचे औचित्य साधून दोघी शिक्षिकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या संस्थेचे अध्यक्ष मनोज पाटील संचालिका, प्रतिक्षा पाटील ,माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका दिपाली देवरे यांनी देखील कौतुक करून शुभेच्छा दिल्या. तर शिक्षिका नीलिमा भारंबे, उज्वला ब्राह्मणकर, स्वर्णलता अ डकमोल,सविता ठाकरे ,मानसी जगताप ,तुषार पवार, शरद बिर्हाडे यांनी फुले वाहून विनम्र अभिवादन केले.