TheClearNews.Com
Friday, March 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अंतर्नाद उषातर्फे ५ दिवसात २५० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

The Clear News Desk by The Clear News Desk
September 7, 2020
in भुसावळ, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ प्रतिनिधी । शहरात सालाबादाप्रमाणे यंदाही अंतर्नाद प्रतिष्ठानने गणरायाला एक दुर्वा समर्पणाची उपक्रम राबविला. अंतर्नादला यावेळेस उषा फाऊंडेशनची साथ मिळाली. गणेशोत्सवाच्या खर्चात बचत करुन दात्यांनी स्वेच्छेने दिलेल्या मदतीतुन गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यात पाटी, पेन्सील, पेन, रंगपेटी, खोडरबरचा समावेश आहे. पाच दिवसापासून राबविण्यात येणार्‍या उपक्रमाचा समारोप जिल्हा परिषद शाळा मुशाळतांडा येथील आदिवासी वस्तीवर करण्यात आला.

उपक्रमाची सुरुवात यावल तालुक्यातील बामणोद येथील जि.प उर्दू शाळा येथून झाली. त्यात नंतर कोसगाव जि.प शाळा, भुसावळ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या मांडवेदिगर, महादेव माळ या शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि संत गाडगेबाबा यांनी दाखवलेल्या मार्गाने अंतर्नाद उषाची वाटचाल सुरु आहे. भविष्यात ह्या शैक्षणिक चळवळीला व्यापक स्वरुप यावे अशी अपेक्षा मान्यवरांनी व्यक्त केली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त विजय पाटील हे होते. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विनोद राठोड, उपाध्यक्ष राजू राठोड, ग्रामपंचायत सदस्य शामराव राठोड, उषा फाऊंडेशनचे अध्यक्ष दिलीप जावळे, पांडुरंग महाजन, मुख्याध्यापक दीपक सुरवाडे आदी उपस्थित होते.

READ ALSO

आर आर विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा

वरणगावात गॅस गोडाऊनमधून ५८ गॅस सिलेंडरची चोरी

‘दातृत्वाच्या दिंडीचे वारकरी’उपक्रमास स्व.शंकर पाटील यांच्या स्मरणार्थ उषा पाटील यांनी तर स्व.सोमा जावळे यांच्या स्मरणार्थ मालती जावळे यांनी शैक्षणिक साहित्य दिले. सोबतच हर्षद महाजन, रघुनाथ सोनवणे, किरण पाटील, किरण चौधरी, सचिन पाचपांडे, दीपक पाटील, लैलेश मास्टे, भूषण शेरीकर यांनीही सहकार्य केले. ‘दात्यांची संख्या वाढावी’ सण उत्सवांना सामाजिक उपक्रमांची जोड देउन राबविण्यात आलेला उपक्रम नक्कीच कौतुकास्पद असाच आहे. दात्यांच्या मदतीच्या माध्यमातून गरीब गरजवंत विध्यार्थी यांची शैक्षणिक साहित्याची गरज भागत आहे.दात्यांनी अश्या उपक्रमाना भरभरून मदत केली पाहिजे असे आदर्श शिक्षक विजय पाटील म्हणाले. भविष्यात व्यापक स्वरूप अंतर्नाद सोबत आम्हीही पहिल्यांदाच या उपक्रमाच्या निमित्ताने जुळलो. एक दुर्वाच्या माध्यमातून गरिब आणि गरजवंत विद्यार्थ्यांची शैक्षणिक गरज भागविता आली याचे फार मोठे समाधान आहे. भविष्यात गरीब आणि गरजवंत विद्यार्थ्यांसाठी या उपक्रमाला अजुन व्यापक स्वरुप देउ, असे उषा फाउंडेशनचे सचिव जिवन महाजन यांनी नमूद केले.

‘शिष्यवृत्ती सुरु करु’ या उपक्रमाच्या माध्यमातून गरीब आणि गरजवंत होतकरू विद्यार्थ्यांना मदतीचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. अंतर्नादच्या माध्यमातून विविध प्रसंगी वर्षभर विद्यार्थ्यांना मदत केलीच जाते. पण दात्यांचे अधिकचे पाठबळ मिळाले तर येणार्‍या काळात अंतर्नादतर्फे गरीब गरजवंत हुशार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती सुध्दा देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत असे प्रकल्प प्रमुख अमितकुमार पाटील यांनी नमुद केले.

भुसावळ प्राथमिक शिक्षक पतपेढी संचालक प्रदीप सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले. प्रस्तावित प्रकल्प प्रमुख अमितकुमार पाटील यांनी तर अंतर्नादच्या उपक्रमाविषयी समन्वयक निवृत्ती पाटील यांनी माहिती दिली. आभार सह समन्वयक भूषण झोपे यांनी मानले. या प्रसंगी माजी ग.स संचालक योगेश इंगळे, उषा फाउंडेशनचे सचिव जिवन महाजन, प्रविण मोरे, सौरव जावळे, अंतर्नादचे अध्यक्ष संदीप पाटील आदी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

आर आर विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा

February 28, 2026
गुन्हे

वरणगावात गॅस गोडाऊनमधून ५८ गॅस सिलेंडरची चोरी

February 27, 2026
गुन्हे

भुसावळमध्ये कार्यालयात कथित अत्याचार ; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

February 20, 2026
भुसावळ

हनुमान जीवन चरित्र सार म्हणजे मारुती स्तोत्र – निरूपणकार डॉ. नितु पाटील

February 14, 2026
भुसावळ

अध्यात्म आणि विज्ञान यांचा संगम म्हणजे रेवा कुटी – रजनी सावकारे

February 14, 2026
भुसावळ

वरणगावात संगीतमय हनुमान चालीसा पठण उपक्रमाची वर्षपूर्ती; वर्षभरात २,८५० पाठ पूर्ण

February 10, 2026
Next Post

गुलाबी बोंड अळींच्या नियंत्रणासाठी चित्ररथाद्वारे जनजागृती मोहिमेस खा. रक्षाताई खडसे यांनी दाखवला हिरवा झेंडा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

व्यापारी बांधवांचा विचार करून निर्णयाची अंमलबजावणी करावी !

May 28, 2021

ओबीसी आरक्षण : भाजपने महाराष्ट्रासाठी रचलेली खेळी देशाला महागात पडली : छगन भुजबळ !

May 10, 2022

जळगाव जिल्ह्यातील खळबळजनक घटना ; बालिकेचा मृतदेह आढळला विहिरीत तर वडील बेपत्ताच !

August 20, 2023

छत्रपती संभाजीनगरात २५० कोटींचे ड्रग्ज जप्त ; गुजरात पोलिस, डीआरआयची धडक कारवाई !

October 23, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group