रावेर ( प्रतिनिधी ) असभ्य वर्तन केल्याप्रकरणी येथील पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी महेंद्र पाटील यांना जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे यांनी निलंबित केल्याने जिल्हा पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे. निलंबनाच्या काळात पाटील यांना जळगाव मुख्यालय देण्यात आले आहे. पोलिस कर्मचारी महेंद्र पाटील यांच्यावर मद्य प्राशन करून कार्यालयात असभ्य वर्तन केल्याचा ठपका असल्याने त्याबाबतचा अहवाल जिल्हा पोलिस अधीक्षकांना पाठवण्यात आला आहे. याची गांभीर्याने दखल घेत जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे यांनी ही महेंद्र पाटील यांना निलंबीत केले आहे.