व्हिएन्ना (वृत्तसंस्था) युरोपातील ऑस्ट्रिया देशाची राजधानी असलेल्या व्हिएन्ना शहरात दहशतवादी हल्ला झाला आहे. एकाच वेळी अनेक ठिकाणी २६/११ प्रमाणे अंदाधुंद गोळीबार करण्यात आला आहे. या हल्ल्यात आतापर्यंत २ लोकांचा मृत्यू झाला आहे.
गोळीबारची घटना शहरातील ६ वेगवेगळ्या ठिकाणी घडली. या घटनेत एका अधिकाऱ्यासह बरेच लोक जखमी झाले आहेत. तर एकाचा मृत्यू झाला आहे. या दहशतवादी घटनेत आतापर्यंत हल्लेखोरांसह एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे. मात्र सूत्रांनी ७ जणांच्या मृत्यूची नोंद केली आहे. व्हिएन्ना पोलीस विभागाच्या म्हणण्यानुसार या हल्ल्यात बरेच लोक जखमी झाले आहेत आणि अद्याप मदतकार्य चालू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका दहशतवाद्याचा शोध सुरू आहे. या घटनेचे व्हिडीओही समोर आले आहे. व्हिएन्ना पोलिसांनी ट्वीट केले आहे की गोळीबाराची घटना रात्री आठ वाजता घडली ज्यामध्ये अनेक गोळ्या झाडल्या गेल्या. व्हिएन्नाच्या पोलिसांनी जनतेला ट्विट करून सावधान राहण्यास सांगितले आहे.