TheClearNews.Com
Friday, April 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरूपदी प्रा. विजय माहेश्वरी !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 5, 2022
in जळगाव, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरूपदी प्रा. विजय लक्ष्मीनारायण माहेश्वरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी शनिवारी (दि. ५) डॉ माहेश्वरी यांची नियुक्ती जाहीर केली. विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. प्रदीप पाटील यांनी दिनांक ७ मार्च २०२१ रोजी राजीनामा दिल्यामुळे कुलगुरुपद रिक्त झाले होते.

READ ALSO

सबगव्हाण टोल नाक्यावर मुजोरी; जळगावच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

जी एस हायस्कूल येथे बक्षीस वितरण समारंभ संपन्न

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरु प्रो. ई. वायुनंदन यांचेकडे सदर पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. डॉ. माहेश्वरी (जन्म ३ जुलै १९६४) यांनी इंदोर येथील देवी अहिल्या विश्वविद्यालय येथून जैवरसायनशास्त्र विषयात पीएच.डी. प्राप्त केली असून त्यांना अध्यापन, संशोधन व प्रशासकीय कार्याचा व्यापक अनुभव आहे.

कुलगुरू नियुक्तीसाठी राज्यपालांनी जम्मु काश्मीरचे सेवानिवृत्त मुख्य न्यायमूर्ती  महेश मित्तल कुमार यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरू निवड समिती गठित केली होती. खडकपूर येथील भारतीय प्रौदयोगिकी संस्थेचे संचालक प्रो. विरेंन्द्र कुमार तिवारी व राज्याचे प्रधान सचिव ओम प्रकाश गुप्ता हे समितीचे सदस्य होते.

समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्यानंतर राज्यपालांनी डॉ माहेश्वरी यांच्या निवडीची घोषणा केली.

गतवर्षी प्रा. पी.पी. पाटील यांनी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात प्रकृती अस्वास्थ्यामुळे राज्यपालांकडे कुलगुरू पदाचा राजीनामा पाठविला होता. त्यानंतर ८ मार्च पासून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन यांच्याकडे प्रभारी कुलगुरूपदाचा पदभार सोपविण्यात आला होता. कुलगुरू निवडीसाठी राज्यपालांनी जम्मु-कश्मीर येथील उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती महेश मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठित केली होती. खरगपूर आयआयटीचे डॉ.वीरेंद्र कुमार तिवारी, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे तत्कालीन प्रधान सचिव ओमप्रकाश गुप्ता या समितीचे सदस्य होते. समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या गुरूवारी मुलाखती घेतल्यानंतर राज्यपालांनी प्रा. माहेश्वरी यांची शनिवारी कुलगुरूपदी नियुक्ती जाहीर केली आहे. सोमवार दि. ७ मार्च रोजी प्रा.माहेश्वरी हे पदभार स्वीकारणार आहेत. दरम्यान प्रा. माहेश्वरी यांनी विद्यार्थी केंद्रबिंदू मानून व सर्वांना सोबत घेऊन काम करणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

सबगव्हाण टोल नाक्यावर मुजोरी; जळगावच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

April 14, 2026
अमळनेर

जी एस हायस्कूल येथे बक्षीस वितरण समारंभ संपन्न

April 9, 2026
जळगाव

खरीप हंगाम २०२६: जळगाव जिल्ह्यात युरीया खतांची पहिली रेक दाखल

April 9, 2026
गुन्हे

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

April 1, 2026
गुन्हे

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

April 1, 2026
जळगाव

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानने सादर केलेल्या संगीत समर्पण या नाटकास चार पारितोषिके प्राप्त

March 4, 2026
Next Post

युक्रेनमधून १३ हजार ३०० भारतीय मायदेशी आणले ; परराष्ट्र मंत्रालयानं दिली माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावात शिवसनेकडून रामदास कदम यांना जोडेमारो आंदोलन ! (व्हिडीओ)

September 21, 2022

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 02 मे 2025

May 2, 2025

Today Horoscope : राशीभविष्य, शनिवार २० मे २०२३ !

May 20, 2023

जळगावातही विद्यार्थी उतरले रस्त्यावर ; जाणून घ्या नेमकं काय घडलं?

January 31, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group