नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राज्यसभा खासदार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांना कोरोनाची लागण झाली आहे.
याबाबत पटेल यांनी ट्वीट करुन माहिती दिली आहे. पटेल यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. गेल्या काही दिवसात जे लोक माझ्या संपर्कात आले होते त्यांना मी विनंती करतो की, त्यांनी स्वतःला आयसोलेट करावे. दरम्यान मंगळवारी भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांनी स्वतः ट्वीट करुन याबाबतची माहिती दिली होती. दरम्यान, भारतात आतापर्यंत 63,12,584 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.
















