जळगाव : महसूल खात्यातील भ्रष्टाचार आपणास महसूलमंत्री थोरातसाहेबांना संपूर्ण माहिती आहे. आम्ही थोरांताकडे तक्रार करीत आहोत. तरीही हे भाऊ ढिम्म! याचा कांग्रेस जनांना राग आला पाहिजे. पदाचा आणि सत्तेचा गैरवापर होत असताना काँग्रेसजन चूप का?, हा मोठा रहस्यमय सवाल आहे?. अशोकराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, राहूल गांधी, सोनिया गांधी यांच्यापर्यंत कैफियत मांडणार आहोतच. कळेल तरी या पाताळप्रवासात कोण कोण सहमत आहे? बघा, वेळीच जाग आली तर! अन्यथा कांग्रेसचा पाताळाकडे प्रवास चालू आहेच !
जिल्ह्यात महसूली विभागातील हप्ते,लांच,कमीशन आता जमीनीवरच्या स्तरावर आलेले आहे. आधी लपून छपून अंडरग्राऊंड होत असत. नंतर टेबलाखालून चालू झाले. आता टेबलावर होऊ लागलेत.पुढे पोलीस आणि कोर्टाच्या पायरीवर होतील.पोलीस सांगतील,दे डाल. कायकू झंझटमे पडता है? रेतीमाफिया ने नाही ऐकले तर, न्यायाधीश निर्णय देतील, तुम्ही रेती चोरी केली तर तहसीलदारला सत्तर हजार रुपये लांच देण्यात यावी. आणि नियमित चोरी करीत असाल तर मंथली पस्तीस हजार रूपये दरमहा एक तारखेला तहसीलदारला द्यावेत. चोरीचे ट्रॅक्टर किंवा डंपर पकडले गेले तर एकाचे अडीच लाख रुपये तहसीलदार किंवा प्रांताधिकारी कडे द्यावेत. आदेशाची पायमल्ली केल्यास एक महिना रेती चोरी करण्यास बंदी घालण्यात येईल. ही सू्त्रबद्ध ,नियोजनबद्ध सुरुवात जळगाव पासून झाली आहे. हप्ते,लांच,कमीशन निरंतर चालावे,पोलीस आणि कोर्टाचे संरक्षण मिळावे म्हणून पोलीस आणि कोर्टाच्या पायरीवर आणून ठेवलेले आहे. जसे काही हप्ते घेणे, लांच घेणे,कमीशन घेणे हा आमचा पदसिद्ध आधिकार आहे.आणि त्यासाठी आम्ही अब्रू जाईपर्यंत लढू. नोकरी जाईपर्यंत लढू.
याबाबत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना मेसेजने,पत्राने,इ मेलने,प्रत्यक्ष संगमनेर जाऊन माहिती दिली. तरीपण हे भाऊ ढिम्म ! का? कळले नाही का?. मग,मंत्री बनलेत कशाला? कळले पण वळत नाही का?मग, राजकारण करतात कशाला? उत्पन्नाचे साधन आहे का? शेती, कारखाने, शाळा आहेत कशाला?. मला नाही वाटत की, महसूलमंत्री थोरातसाहेबांनी मंत्रीपदाचा वापर आर्थिक स्रोतसाठी केला नाही. तर त्यांना गरीबीत जीवन कंठावे लागेल. त्यांच्याकडे इतकी संपत्ती, साधनसामग्री आहे की, ते मंत्री म्हणून प्रामाणिकपणे काम करू शकतात. कांग्रेसची प्रतिमा उजळ करू शकतात. पण तसे करायचे नसेल तर ! कांग्रेसचे पुर्ण पतन करायचे असेल तर !
कांग्रेसजन, जे या महसूलमंत्री तथा प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत. त्यांनी आता उघड-उघड मतप्रदर्शन केले पाहिजे. लढा सुरु होतो तेंव्हाच सैनिक बनण्याची गरज असते. सच्चा नागरिक, इमानदार कार्यकर्ता बनण्याची गरज आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आता मंत्री पद आणि अध्यक्षपद बगलेत ठेवूनही काहीच करीत नाहीत. मग,करतात काय? दोन्ही पदे बगलेत का दाबून ठेवलीत?आर्थिक लाभाशिवाय काय? की, कांग्रेसच्या कल्याणासाठी? त्यांच्या कृतीने, भुमिकेने कांग्रेसचे कल्याण न होता नुकसान मात्र होत आहे. मग,पहिले कारण खरे कि खोटे? हे आता कांग्रेसजन किंवा कांग्रेस अध्यक्ष यांनी थोरातसाहेबांना विचारले पाहिजे. ते विचारत नाहीत म्हणून आम्ही जळगाव जिल्ह्यातील जागृत नागरिक विचारत आहोत. आमची जवळून खात्री झाली आहे की महसूलमध्ये नक्कीच चुकीचे काम चालू आहे. ज्यामुळे प्रशासन ठप्प झालेले आहे. जे कांग्रेसला बरबाद करीत आहे.
महसूल खात्यातील भ्रष्टाचार आपणास महसूलमंत्री थोरातसाहेबांना संपूर्ण माहिती आहे. आम्ही थोरांताकडे तक्रार करीत आहोत. केली अनेकदा, तरीही हे भाऊ ढिम्म! याचा कांग्रेस जनांना राग आला पाहिजे. जर येत नसेल तर ते कांग्रेसजन महसूलमंत्र्यांच्या पापात सामील असू शकतात का? पदाचा आणि सत्तेचा गैरवापर होत असताना कांग्रेसजण चूप का?, हा मोठा रहस्यमय सवाल आहे?. याच्या उत्तरात कांग्रेसचे अधःपतनाचे कारण दडलेले आहे. आमचे महसूलमंत्री ,कांग्रेसचे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी हा विडा उचललेला आहे. हे गांधी नेहरूंची कांग्रेस मानणाऱ्या नेत्यांना, कांग्रेसजनाना, मतदारांना सुचवत आहोत. अशोकराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, राहूल गांधी, सोनिया गांधी यांचेपर्यंत कैफियत मांडणार आहोतच. कळेल तरी या पाताळप्रवासात कोण कोण सहमत आहे? बघा, वेळीच जाग आली तर! अन्यथा कांग्रेसचा पाताळाकडे प्रवास चालू आहेच !
जळगाव जिल्हा जागृत जनमंचचे शिवराम पाटील यांच्या फेसबुक वॉलवरून साभार
(मो. ९२७०९६३१२२)
(लेखक वरिष्ठ सामाजिक कार्यकर्ते आहेत.)
सूचना : या लेखात व्यक्त केले गेलेले विचार लेखकाचे स्वतःचे विचार आहेत. या लेखातील टीका, टिप्पणी, अथवा सत्यतेप्रती ‘क्लिअर न्यूज’ उत्तरदायी नाहीय. या लेखातील सर्व मुद्दे जशीच्या तशी घेण्यात आली आहेत. या लेखातील कोणतीही माहिती अथवा व्यक्त करण्यात आलेले विचार ‘क्लिअर न्यूज’चे नाहीत.