चाळीसगाव (प्रतिनिधी) केंद्र सरकारचा कांदा निर्यात बंदीचा प्रस्ताव हा कोरोनाच्या संकटकाळात कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी धक्कादायक निर्णय आहे. निर्यातबंदीमुळे बाजारातील कांद्याच्या किंमती वाढल्या आहेत. केंद्र सरकारने केलेली निर्यात बंदी, शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारी आहे. केंद्र सरकारने हा निर्यात बंदीचा निर्णय तात्काळ मागे घेऊन शेतकर्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी केली. ते चाळीसगावात कांदा निर्यात बंदीविरुद्धच्या आंदोलन प्रसंगी बोलत होते.
केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे शेतकरी वर्गामध्ये संतापाची लाट आहे. त्यामुळे या निर्णयाविरोधात चाळीसगाव तालुका शिवसेनेने आंदोलन पुकारले आहे. आता केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी मागे घ्यावी, अशी मागणी करत तहसील कार्यालयाच्या आवारात शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले. याबाबत चाळीसगाव तहसीलदार अमोल मोरे यांना निवेदन दिले. यावेळी मोदी सरकार विरोधात घोषणा करत आंदोलन करण्यात आले मोदी सरकार हाय हाय, निर्यात बंदी झालीच पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या.
महाराष्ट्रातील शेतकरी संघटना आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व कृषिमंत्री दादासाहेब भुसे याबाबत गंभीर असून केंद्र सरकारशी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहे या खात्याचे मंत्री ना पियुष गोयल यांच्याकडे कांदा निर्यात बंदी हटवण्याची मागणी चाळीसगाव तालुका शिवसेनेने केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कांद्याला भाव मिळत असल्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना चांगला दर मिळत आहे. या निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांना नुकसान होत आहे. चाळीसगाव तालुक्यातील अतिवृष्टीमुळे तसेच अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला असून हवालदिल झाला तरी यासाठी चाळीसगाव तालुक्यातील शेतकरी पंचनामे होऊन लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी तसेच लवकरात लवकर निर्यात बंदी उठवावी व नुकसानभरपाई शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देखील यावेळी देण्यात आला.
यावेळी शिवसेना जिल्हा प्रमूख गुलाबराव वाघ, उपजिल्हा प्रमूख रोहिदास पाटील, जिल्हा समन्वयक महेंद्र पाटील, तालुकाप्रमुख रमेश आबा चव्हाण, विधानसभा क्षेत्र प्रमुख भीमराव खलाणे, शहर प्रमुख नानाभाऊ कुमावत, तालुका प्रवक्ता दिलीप घोरपडे, तालुका संघटक सुनील गायकवाड, रघुनाथ कोळी, शैलेंद्र सातपुते, संजय ठाकरे, प्रभाकर उगले, शेख जावेद, वसीम चेअरमन, संजय पाटील, नाना शिंदे, बापू नवले, अनिल कुडे, दिलीप राठोड, ऋषिकेश देवरे, दिनेश घोरपडे, नंदू गायकवाड, नकुल पाटील, बापू लेणेकर,अजिज मिर्झा, गणेश भवर, धर्मा खंडू काळे, ज्ञानेश्वर शिंदे, संजय पाटील, प्रेमदास पाटील, आधार गायकवाड, रवींद्र चौधरी, दिलीप पाटील, बंटी पाटील, अजित देशमुख, हेमंत निकम, रवींद्र चौधरी, निलेश गायके अदि उपस्थित होते.
















