नवी दिल्ली (वृत्तसंस्था) गेल्या काही दिवसांपासून देशात अडीच लाखांहून अधिक कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. देशात गेल्या २४ तासांत २ लाख ५८ हजार ०८९ कोरोना रुग्णांची नोंद झालीय. ओमिक्रॉन (Omicron) बाधितांची संख्या देखील आठ हजारांच्या वर गेली आहे. तर ३८५ जणांचा मृत्यू झाला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे २,५८,०८९ रुग्ण आढळले आहेत. शुक्रवारच्या तुलनेत दैनंदिन प्रकरणांमध्ये ४ टक्क्यांनी घट झाली आहे. शुक्रवारी देशात कोरोनाचे २,७१,२०२० बाधितांची नोंद करण्यात आली होती. यासह, गेल्या २४ तासांत देशात ८२०९ ओमायक्रॉन रुग्ण आढळले. शुक्रवारच्या तुलनेत ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये ६.२ टक्क्यांची वाढ झाली आहे. तर, ३८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
गेल्या २४ तासांत १ लाख ५१ हजार ७४० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत ३ कोटी ५२ लाख ३७ हजार ४६१ जण कोरोनातून बरे झाले आहेत. तर, देशात सध्या १६ लाख ५६ हजार ३४१ सक्रिय रुग्ण उपचाराधीन आहेत. देशात दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट ११९.६५ टक्के आहे. शुक्रवारच्या तुलनेत देशात १३ हजार ११३ कमी बाधित नोंदवले गेले आहेत. तर, देशातील रिकव्हरी रेट सध्या ९४.२७ टक्के आहे. देशात आतापर्यंत १५७.२० कोटी लसीचे डोस देण्यात आले आहेत. तर आतापर्यंत एकूण ७०.३७ कोटी चाचण्या करण्यात आल्या आहेत.
राज्यातील स्थिती
महाराष्ट्रात रविवारी दिवसभरात कोरोना संसर्गाचे ४१,३२७ नवे रुग्ण आढळून आले असून आणखी २९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी राज्यात ४२,४६२ संसर्गाची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांत महाराष्ट्रात ४०,३८६ कोरोनारुग्ण संसर्गमुक्त झाले असून, आतापर्यंत राज्यात ६८,००,९०० लोक बरे झाले आहेत. उपचाराधीन रुग्णांची संख्या २,६५,३४६ इतकी आहे. राज्यातील एकूण कोरोनारुग्णांची संख्या ७२,११,८१० झाली असून मृतांची संख्या १,४१,८०८ वर पोहोचली आहे. एका दिवसात ओमायक्रॉन व्हेरियंटचे आठ नवे रुग्ण आढळल्याने एकुण ओमायक्रॉनबाधितांची संख्या ९३२ वर पोहोचली आहे. राज्यात कोरोना संसर्ग मृत्यूदर १.९६ टक्के आहे तर संसर्गातून बरे होण्याचे प्रमाण ९४.३ टक्के आहे.