जळगाव (प्रतिनिधी) आदिल शहा फारुकी बहुउद्देशीय संस्थेमार्फत २०२२ चा खानदेश गौरव पुरस्कार जळगाव ईदगाह व कब्रस्तान ट्रस्टचे सहसचिव अनिस शाह यांना देऊन गौरविण्यात आले.
जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातिल अल्पबचत भवन येथे आदिलशहा फारुकी बहुउद्देशीय संस्थेमार्फत २०२२ चे महाराष्ट्र गौरव व खानदेश भूषण पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिव श्री संजीव सोनवणे यांच्या हस्ते अनिस शहा यांना गौरविण्यात आहे. अनिस शहा यांनी कोरोना काळात कोविड पॉझिटिव्ह असलेले ११९ मृतदेह स्वतः दफन केले होते. तसेच काही हिंदू समाजाच्या लोकांचे सुद्धा दफन विधी केल्याबद्दल त्यांना शाह बहुउद्देशिय संस्थेतर्फे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पुरस्कार शिव श्री संजीव सोनवणे यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी व्यासपीठावर पुण्याच्या श्रीमती शबनम शेख, मनियार बिरादरीचे फारुख शेख, जमीयत उलमा हिंदचे मुफ्ती हारून नदवी, धुळेचे अडव्होकेट जुबेर शेख,अडावदचे फारुक पटेल, अजमल शाह, डॉ करीम सालार व संस्थेचे अध्यक्ष फारुक शाह उपस्थित होते.