जळगाव (प्रतिनिधी) ज्येष्ठ पत्रकार दिलीप तिवारी यांनी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना ‘गुलाबभू, शिवसेनानी गढी बन व्हयनी !’ या आशयाचे खास अहिराणी भाषेत पत्र लिहिले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून हे पत्र चांगलेच व्हायरल होत आहे.
आरणीय पायकमंत्री तथा खानदेशी मुलखमैदानतोफ
गुलाबभू जयमहाराष्ट्र,
जय उद्धभू ठाकरे,
जय शिवसेना
गुलाबभू तुमना राज मां समद बराबर चालू शे. कोरोना वाढी रायना पन डागटर लोकेस्नी आते कंटरोल आनेल शे. आमना बठ्ठा खासगी डागटरे आपला हास्पिटलले कोवीड हास्पिटलमां बदली रायनात. खाटा कमी अन पेशन्ट गहीरा. पेशन्ट गहीरा त माल भी गहीरा. त्यागुन्ता आते कोठेच हाक नी बोंब नी. तुमी बी जठे फिरान तठे फिरी रायनात. ज्याले आरी टोचानी त्याले टोची रायनात. आस्स समद मजा मा चालू शे.
गुलाबभू तुमनी वयख मुलूखमैदान तोफ म्हनीसन समदा खानदेशमां शे. पायधीमां आपला गढीवर लोकेस्ना कामे व्हई जातस. काही माही कामे रेस्ट हाऊसवर व्हतस. पन गुलाबभू. मी आस्स देख, गोलानी मार्केटमांधल आपल शिवसेना हापिसना गढीले कुलूप लागेल शे म्हने. १५ दिन झायात गढीन कुलूप उघडाले कोनी ऊन नइ म्हने. आते आस्सा परचार गोलानीमा शे.
गुलाबभू, गोलानी मातला गढीमां बसेल बठ्ठा कार्यकर्ता मोठा पुढारी व्हयनात. शहर मां आपला शहर परमुख शे. महापालिका मां इरोधी पक्षनेता शे. गट नेता शे. जिल्हा मां ४ शिवसेनाना व १ खांदा देल आमदार शे. पार्टी तशी जोरमां शे. पन त्या गढीना दरवाजा उघडनारले सऊ महिनापासून पगार देल नइ. मंग त्यानी बी कुलूप लाइ टाकेल शे. तुमना संपर्क पायधीले नै तर रेस्ट हाऊसवर व्हस. शहर परमुख ल्लीमां ऱ्हास. बाकीनास्ना बंगला शेतस. पन पार्टीना हापीसले कुलूपशे हाइ काय बराबर नइ गडा.
आमना पत्रकारभू संजयदादा राऊत उत्तर महाराष्ट्रना संपर्क परमुख शे. म्हने तीन पक्षन सरकार तो दादाच चालाडस. जयगाव, धुया, नंदरबार अन नासिक बी त्यास्नाकडेच शे. जिल्हा ना संपर्क परमुख संजय सावंत शे. या लोकेस्ले जर समजन गढीना दरवाजा उघडनारले पगार देतस नइ त कितली बदनामी हुई … पार्टी महाराष्ट्रमां नंबर वन अन जयगावमां गढी कुलूप बंद …. बाबा रे बाबा … काय बोलान ???
गुलाबभू, गढीना दरवाजा उघडानी कायबी वैवस्था करा …
आपला दोस्त
कवय मवय चिठ्ठी लिखनारा
दिलीप तिवारी, जयगाव