मुंबई वृत्तसंस्था । ड्रग्स प्रकरणी अभिनेत्री सारा अली खानची आज चौकशी होणार आहे. त्यामुळे अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि श्रद्धा कपूर यांच्या पाठोपाठ सारादेखील एनसीबी कार्यालयात दाखल झाली आहे. त्यामुळे आज दीपिका, सारा आणि श्रद्धा या तिघींची एनसीबी चौकशी करणार असल्याचं दिसून येत आहे.
अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) बुधवारी अभिनेत्री दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि रकुल प्रीत सिंह यांना समन्स बजावून चौकशीस हजर राहण्याची सूचना केली होती. त्यानुसार, शुक्रवारी ( २५ सप्टेंबर) रकुल प्रीतची चौकशी झाली असून आज, शनिवारी (२६ सप्टेंबर) सारा अली खानची चौकशी होणार आहे. सुशांत मृत्यू प्रकरणातील प्रमुख संशयित, अभिनेत्री रिया चक्रवर्तीने चौकशीदरम्यान साराच्या नावाचा उल्लेख केला होता. त्यामुळे एनसीबी तिची चौकशी करणार आहे.