TheClearNews.Com
Monday, August 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सुवर्णपेढीतील कारागिराला शॉक देत दागिने लांबवण्याचा प्रयत्न

प्रसंगावधान राखत संशयिताचा पाठलाग करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा प्रयत्न विफल; संशयित पसार

vijay waghmare by vijay waghmare
May 18, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील सुवर्ण पेढीच्या दालनातील वर्कशॉपमध्ये शिरलेल्या एका अनोळखीने दागिने तयार करणाऱ्या कारागिराला करंट मशिनद्वारे शॉक दिला. त्यानंतर तेथून दागिने लांबविण्याचा प्रयत्न केल्याची घटना दि. १६ मे रोजी बालाजी पेठेत घडली. परंतू कारागिराने संशयितासोबत झटापट करीत तो बाहेर पळत आला. त्यानंतर इतर कर्मचाऱ्यांनी संशयिताचा पाठलाग करीत पकड्याचा प्रयत्न केला, मात्र तो पर्यंत तो संशयित दुचाकीने पसार झाला होता. याप्रकरणी शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील बालाजी पेठेतील आर.एल. ज्वेलर्स शोरुमच्या मागे असलेल्या याच सुवर्ण दालनाच्या दागिने तयार करण्याच्या वर्कशॉपमध्ये चांदी कारागिर भरत वसंतराव भामरे (४१, रा. आर.एल. कॉलनी) हे दि. १६ मे रोजी काम करीत होते. त्यावेळी तोंडाला रुमाल बांधलेला व टोपी घातलेला एक अनोळखी व्यक्ती त्याठिकाणी आला. त्याने अचानक भामरे यांचे केस पकडून डोक्याला, कानाखाली करंट मशिनने शॉक दिला. त्या वेळी आरडाओरड करीत कारागिराने विरोध केला, मात्र तो सतत शॉक देत राहिला. त्या वेळी दोघांमध्ये झटापट होऊन कारागिराने वरील मजल्यावर जाण्याचा प्रयत्न केला. मात्र अनोळखी त्यांना पायऱ्यांवरून खाली ओढत होता. या प्रकरणी कारागिराने शनिपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात ३५ ते ४० वर्षीय व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक संतोष खेडकर करीत आहेत.

READ ALSO

तरुणाला हात-पाय बांधून अमानुष मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

महावितरणकडून आता दर महिन्याला ‘ग्राहक समाधान शिबिर’

संशयित दुचाकीवरुन पसार

झटापट करीत असलेल्या कारागिर भामरे यांनी कसेबसे तळ मजल्यावरून वर्कशॉपच्या बाहेर पडले. तेव्हा अनोळखी व्यक्ती त्यांचा पाठलाग करीत तेथेही पोहचला. मात्र त्याठिकाणी असलेल्या इतर कर्मचाऱ्यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र तो दुचाकीवर बसून पसार झाला.

शॉक देत बेशुद्ध करण्याचा केला प्रयत्न

कारागिर भरत भामरे हे वर्कशॉपच्या तळमजल्यामध्ये चांदीचे दागिने तयार करीत होते. तळमजला असल्याने अनोळखीने तेथे शिरून कारागिराला शॉक देत बेशुद्ध करण्याचा व त्यानंतर दागिने लांबविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र कारागिर बाहेर पडल्याने इतरांना हा प्रकार समजल्यामुळे चोरट्याचा दागिने लांबविण्याचा प्रयत्न फसला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonAttempt to remove jewelry by shocking a craftsman in a gold shop

Related Posts

गुन्हे

तरुणाला हात-पाय बांधून अमानुष मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

August 17, 2026
जळगाव

महावितरणकडून आता दर महिन्याला ‘ग्राहक समाधान शिबिर’

August 16, 2026
जळगाव

महावितरणच्या जळगाव परिमंडलात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 16, 2026
जळगाव

महावितरणचा वीजचोरांना तडाखा; राज्यात १९ हजारांवर वीजचोऱ्या उघड

August 16, 2026
गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
जळगाव

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

August 14, 2026
Next Post

पिकांची उत्पादकता वाढीसाठी शेतकऱ्यांनी पर्यावरणपूरक आणि जास्त कार्यक्षम नॅनो खतांचा वापर करावा - जिल्हाधिकारी रोहन घुगे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावात शिवसेनेचे आंदोलन अधिक आक्रमक ; उड्डाण पुलावर रास्तारोको सुरु !

October 13, 2022

Today Horoscope : आजचे राशीभविष्य १६ ऑक्टोबर २०२३ !

October 16, 2023

बँक खात्यात पैसे भरून देण्याच्या नावाखाली एकाची ५० हजारात फसवणूक ; जामनेर पोलिसात गुन्हा !

June 24, 2022

गुंतवणूक करण्याचे अमिष दाखवून महिलेची ६६ लाखात फसवणूक !

March 3, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group