TheClearNews.Com
Monday, November 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आडगाव येथे वैचारिक स्वराज्याचा ‘खान्देश कर्तृत्व पर्व २०२६’ सोहळा दिमाखात संपन्न

vijay waghmare by vijay waghmare
November 16, 2026
in एरंडोल, विशेष लेख, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

एरंडोल (प्रतिनिधी) – डॉ. सुभाष बाबा भामरे यांच्या अध्यक्षतेखाली सोहळा; अरुणभाई गुजराथी यांच्या हस्ते ‘वेध’ वार्षिकांकाचे प्रकाशन; संत एकनाथ महाराजांचे वंशज डॉ. पुष्कर महाराज गोसावी यांच्यासह अकरा मान्यवरांचा गौरव

आडगाव, ता. एरंडोल : संतविचारांचा जागर, वारकरी परंपरेचा भक्तिमय आविष्कार आणि समाजातील कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांच्या कार्याचा गौरव… अशा त्रिवेणी संगमाने आडगावची भूमी अक्षरशः भारावून गेली. टाळ-मृदंगाचा गजर, संतपरंपरेचा सुगंध आणि विचारांची मेजवानी अशा वातावरणात वैचारिक स्वराज्य आयोजित ‘खान्देश कर्तृत्व पर्व २०२६’ हा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. जणू पंढरपूरची वारीच आडगावच्या नगरीत अवतरल्याचा अनुभव उपस्थितांना आला. खान्देशातील कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा सन्मान आणि ‘वेध’ वार्षिकांकाचे प्रकाशन अशा दुहेरी पर्वणीने या सोहळ्याने लक्ष वेधून घेतले. आडगावसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती हे या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 नोव्हेंबर 2026 !

जळगाव परिमंडलातील ९६ हजार घरांच्या छतांवर वीजनिर्मिती !

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारत सरकारचे माजी केंद्रीय संरक्षण मंत्री डॉ. सुभाष बाबा भामरे होते. महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मान्यवरांच्या हस्ते ‘वैचारिक स्वराज्य वेध वार्षिकांक २०२६-२७’चे प्रकाशन करण्यात आले. संत एकनाथ महाराजांचे चौदावे वंशज ह.भ.प. डॉ. पुष्कर महाराज गोसावी यांची विशेष आध्यात्मिक उपस्थिती लाभली. याशिवाय गुलाबरावजी वाघ, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील आणि ॲड. विश्वासराव भोसले उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी संत माऊलींच्या प्रतिमेचे पूजन, पुष्पहार अर्पण आणि दीपप्रज्वलनाने सोहळ्याला मंगलमय सुरुवात झाली. उपस्थित मान्यवरांचा सन्मान करण्यात आल्यानंतर ‘वेध’ वार्षिकांकाचे प्रकाशन झाले. संस्थेचे संस्थापक ह.भ.प. दिनेश महाराज पाटील फरकांडेकर यांनी प्रास्ताविकातून वैचारिक स्वराज्याच्या स्थापनेमागील भूमिका, संस्थेचा प्रवास, संतविचारांचा प्रसार आणि सामाजिक, आध्यात्मिक व सांस्कृतिक क्षेत्रातील उपक्रमांची माहिती दिली. समाजातील गुणी माणसांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानाचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हाच कर्तृत्व पर्व आयोजनामागील मुख्य हेतू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यानंतर मान्यवरांच्या मनोगतांनी कार्यक्रमाला वैचारिक उंची प्राप्त झाली. धरणगावच्या लीलाताई चौधरी यांनी महिलांनी कोणत्याही क्षेत्रात स्वतःला कमी न समजता आत्मविश्वासाने आणि निर्भीडपणे कर्तृत्व सिद्ध करावे, असे आवाहन केले. प्राचार्य सुनील पाटील यांनी आपल्या प्रभावी वक्तृत्वातून वैचारिक स्वराज्याची संकल्पना उलगडली. देशाला राजकीय स्वातंत्र्य मिळाले असले, तरी समाजात वैचारिक स्वातंत्र्य, विवेक आणि स्वतंत्र विचारांची जाणीव रुजणे आवश्यक आहे. समाजजागृती आणि प्रबोधनाच्या माध्यमातून वैचारिक स्वराज्याचे कार्य महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे सर यांनी सामाजिक जीवनातील अनुभव मांडत संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. त्यानंतर गुलाबरावजी वाघ यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

संत एकनाथ महाराजांचे चौदावे वंशज ह.भ.प. डॉ. पुष्कर महाराज गोसावी यांनी सध्याच्या पुरस्कार संस्कृतीवर परखड भाष्य केले. आज अनेक ठिकाणी पुरस्कारांचा बाजार मांडला जात आहे. व्यक्तीचे चारित्र्य, कार्य आणि योगदान यांचा विचार न करता पुरस्कार दिले जातात. मात्र दिनेश महाराजांनी समाजातील खऱ्या अर्थाने कार्य करणारे दहा हिरे शोधून त्यांचा सन्मान केला. वैचारिक स्वराज्य ही माणसाच्या गुणवत्तेला किंमत देणारी संस्था असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.

माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी वैचारिक स्वराज्याच्या कार्याचे विशेष कौतुक केले. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या विचारांचा प्रचार-प्रसार करणाऱ्या वैचारिक स्वराज्यासारख्या संस्था प्रत्येक गावात निर्माण झाल्या पाहिजेत. अशा चळवळींना समाजाने पाठिंबा द्यावा आणि दिनेश महाराजांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

यानंतर संत एकनाथ महाराजांचे चौदावे वंशज ह.भ.प. डॉ. पुष्कर महाराज गोसावी यांना वैचारिक स्वराज्याच्या वतीने विशेष जीवनगौरव पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. त्यानंतर डॉ. सुभाष बाबा भामरे, अरुणभाई गुजराथी, डॉ. पुष्कर महाराज गोसावी आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते खान्देशातील दहा कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले.

पुरस्कारार्थी पुढीलप्रमाणे :

१. ह.भ.प. भानुदास महाराज आडगावकर – जीवनगौरव पुरस्कार.

२. श्री. दिलीप खोडपे सर – लोकशिक्षक पुरस्कार.

३. श्रीमती लीलाताई चौधरी – खान्देशाची रणरागिणी पुरस्कार.

४. श्री. भागवत पाटील – समाजभूषण पुरस्कार.

५. श्री. भैय्यासाहेब पाटील – समाजभूषण पुरस्कार.

६. प्रा. श्री. सुनील पाटील – जीवनगौरव पुरस्कार.

७. श्री. विनायक पाटील – खान्देशचा बळीराजा पुरस्कार.

८. जिल्हा परिषद शाळा, होळ – ज्ञानदीप लावू जगी पुरस्कार.

९. श्री. संजय हिरे – शब्दसाधना पुरस्कार.

१०. श्री. अमृत देशमुख – लोकसेवक पुरस्कार.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतात डॉ. सुभाष बाबा भामरे यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. आपण आजवर अनेक पुरस्कार सोहळे पाहिले; मात्र खान्देशातील कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा शोध घेऊन त्यांच्या कार्याचा सन्मान करणारा हा सोहळा अप्रतिम असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे संस्थापक ह.भ.प. दिनेश महाराज पाटील फरकांडेकर यांनी केले. सूत्रसंचालन राजेंद्र ठाकरे यांनी केले, तर ॲड. विश्वासराव भोसले यांनी आभार प्रदर्शन केले. वारकरी परंपरेचा भक्तिमय आविष्कार, संतविचारांचा जागर आणि सामाजिक कर्तृत्वाचा गौरव अशा मंगलमय वातावरणात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पसायदानाने सोहळ्याची सांगता झाली.

पुरस्कार देणारे अनेक असतात; पण समाजातील खरे हिरे शोधून त्यांना सन्मानाने समाजासमोर आणण्याची भूमिका घेणारे उपक्रम विरळच असतात. वैचारिक स्वराज्याच्या ‘खान्देश कर्तृत्व पर्वा’ने हाच वेगळा आदर्श निर्माण केला. आडगावच्या भूमीत रंगलेला हा सोहळा म्हणजे केवळ पुरस्कारांचा उत्सव नव्हे, तर संतविचार, सामाजिक बांधिलकी आणि माणसाच्या कर्तृत्वाचा सन्मान करणारा खान्देशच्या वैचारिक वाटचालीतील एक महत्त्वपूर्ण अध्याय ठरला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: ErandolThe ‘Khandesh Kartrutva Parva 2026’ (Khandesh Achievement Festival 2026)—a celebration of intellectual self-rule—concluded with great grandeur in Adgaon.

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 नोव्हेंबर 2026 !

November 16, 2026
जळगाव

जळगाव परिमंडलातील ९६ हजार घरांच्या छतांवर वीजनिर्मिती !

November 15, 2026
जळगाव

महावितरणमध्ये बिरसा मुंडा यांना अभिवादन

November 15, 2026
अमळनेर

पत्रकार सुरेश कांबळे विशेष सन्मानाने सन्मानित

November 15, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 15 नोव्हेंबर ते 22 नोव्हेंबर 2026 !

November 15, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 14 नोव्हेंबर 2026 !

November 14, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मंत्रालय दारू प्रकरण : आता कळाले… गुलाबराव येड्यासारखी का बडबड करतात ; नितेश राणेंचा टोला !

August 11, 2021

सोमय्या बाप बेट्याला जेलमध्ये जावेच लागेल ; राऊतांचा पुन्हा इशारा

April 7, 2022

शासन आणि प्रशासन जिल्ह्याच्या विकासासाठी कटीबद्ध : पालकमंत्री गुलाबराव पाटील

January 26, 2022

पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडेंनी घेतली अभिनव विद्यालयातील अभिनव उपक्रमाची दखल..!

September 2, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group