TheClearNews.Com
Sunday, November 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव परिमंडलातील ९६ हजार घरांच्या छतांवर वीजनिर्मिती !

३५८ मेगावॅट क्षमतेचे सौरऊर्जा संच स्थापित; सूर्यघर योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद

vijay waghmare by vijay waghmare
November 15, 2026
in जळगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव/धुळे/नंदुरबार (प्रतिनिधी) – वाढती विजेची गरज आणि दरमहा येणाऱ्या वीजबिलाचा भार कमी करण्यासाठी जळगाव परिमंडलातील घरगुती ग्राहक आता सौरऊर्जेकडे वळत आहेत. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांतील ९६ हजार ६५५ घरांच्या छतांवर ३५७.९७ मेगावॅट स्थापित क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. त्यातून घरगुती ग्राहक केवळ वीज वापरणारे न राहता वीजनिर्मातेही बनू लागले आहेत. ७८ हजार रुपयांपर्यंत अनुदान असलेल्या या योजनेत वीजबिल जवळपास शून्य करणे शक्य असल्याने जास्तीत जास्त ग्राहकांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांनी केले आहे.
पूर्वी घरांच्या छतांचा वापर प्रामुख्याने पाण्याच्या टाक्या किंवा अडगळीतले साहित्य ठेवण्यासाठी होत असे. आता याच छतांवर सौर पॅनेल उभारून वीजनिर्मिती केली जात आहे. यासाठी स्वतंत्र जागेची आवश्यकता नसल्याने शहरी आणि ग्रामीण भागातील ग्राहकांना हा पर्याय उपयुक्त ठरत आहे. सौरऊर्जेतून तयार होणारी वीज घरगुती वापरासाठी उपलब्ध होत असल्याने पारंपरिक वीजपुरवठ्यावरील अवलंबित्व आणि वीजबिलाचा भार कमी करण्यास मदत होत आहे.
घरावर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी सुरुवातीला गुंतवणूक करावी लागते. मात्र, प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत पात्र ग्राहकांना शासनाकडून अनुदान दिले जात असल्याने प्रकल्प उभारणीचा आर्थिक भार कमी होतो. त्यामुळे घरगुती ग्राहकांचा सौरऊर्जेकडे कल वाढला आहे. उपलब्ध छताचा वापर करून स्वतःची वीज निर्माण करण्याची संधी या योजनेमुळे उपलब्ध झाली आहे. छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून घरगुती वीजग्राहकांना एक किलोवॅटसाठी ३० हजार रुपये, दोन किलोवॅटसाठी ६० हजार रुपये आणि तीन किलोवॅट आणि त्यापेक्षा जास्त क्षमतेसाठी कमाल ७८ हजार रुपये अनुदान थेट मिळत आहे. गृहनिर्माण संस्था, गृहसंकुलांसाठी विद्युत वाहन चार्जिंग स्टेशन व सामायिक उपयोगासाठीही अनुदान देण्यात येत आहे.
घराच्या छतावर १ ते ३ किलोवॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा निर्मिती प्रणालीद्वारे घरगुती ग्राहकांना दरमहा सुमारे १२० ते ३६० युनिट वीज मोफत मिळविण्याची संधी या योजनेत मिळत आहे. त्यामुळे या योजनेस जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत वीजग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत जळगाव जिल्ह्यातील ६१ हजार ५३५ ग्राहकांनी २३०.४६ मेगावॅट, धुळे जिल्ह्यातील २४ हजार २६७ ग्राहकांनी ८८.२७ मेगावॅट तर नंदुरबार जिल्ह्यातील १० हजार ८५३ ग्राहकांनी ३९.२३ मेगावॅट स्थापित क्षमतेचे सौर ऊर्जा संचावर घरावर उभारले आहेत.
घरगुती वीज ग्राहकांना छतावर सौर ऊर्जानिर्मिती संच बसवता यावा यासाठी विविध बँकांकडून सवलतीच्या व्याजदराने कर्जाची सोय उपलब्ध आहे तसेच कर्जाची प्रक्रियाही सुलभ करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यास ग्रामीण ग्राहकांना प्रोत्साहन देणाऱ्या ग्रामपंचायतींना प्रोत्साहन निधीही देण्यात येणार आहे. योजनेत कार्यान्वित झालेल्या सौर प्रकल्पांतून निर्माण झालेली वीज ग्राहकांना वापरता येते. शिवाय ग्राहकाची गरज भागवून वीज शिल्लक राहिल्यास महावितरणकडून त्याची रक्कम संबंधित ग्राहकांच्या वीजबिलात समायोजित केली जात आहे.

३०० युनिटपर्यंत मासिक वीजवापर असणाऱ्या घरगुती वीजग्राहकांसाठी ही योजना अतिशय उपयुक्त आहे. सुमारे २५ वर्षे या सौर प्रकल्पांतून घरातील वीजवापरासाठी मोफत वीज उपलब्ध होणार आहे. ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा.
– आय.ए. मुलाणी, मुख्य अभियंता, महावितरण, जळगाव परिमंडल

READ ALSO

महावितरणमध्ये बिरसा मुंडा यांना अभिवादन

पत्रकार सुरेश कांबळे विशेष सन्मानाने सन्मानित

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaon000 homes in the Jalgaon circle!Electricity generation on the rooftops of 96

Related Posts

जळगाव

महावितरणमध्ये बिरसा मुंडा यांना अभिवादन

November 15, 2026
अमळनेर

पत्रकार सुरेश कांबळे विशेष सन्मानाने सन्मानित

November 15, 2026
गुन्हे

पोलीस कर्मचाऱ्याच्या घरातून दागिने लंपास

November 15, 2026
गुन्हे

दिवाळीत गावाला गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

November 14, 2026
गुन्हे

आनंद मेळाव्यात दोघांवर चाकू हल्ला

November 14, 2026
गुन्हे

कुटूंब गावाला गेल्याची संधी साधत चोरट्यांची ‘दिवाळी’

November 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘मुख्यमंत्र्यांच्या नाकर्तेपणामुळे स्थानिक प्रशासन मुजोर झालंय’ : अतुल भातखळकर

April 15, 2021

रब्बी हंगामासाठी पाटाला आर्वतन सोडण्यासह विविध मागण्यांचे ठाकरे गटाचे निवेदन !

November 17, 2022

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 12 नोव्हेंबर 2025 !

November 12, 2025

..तर राजकारणाला रामराम करणार, राजीनामा देऊन टाकणार : उदयनराजे भोसले

September 18, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group