नवी दिल्ली (वृत्तसंस्था) गेल्या २४ तासांत रुग्णसंख्येत विक्रमी झाली असून आता चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल ८५,३६२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर १,०८९ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ५९, ०३,९३३ इतकी झाली आहे. यापैकी ९,६०,९६९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर देशातील ४८,४९,५८५ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. मात्र, कोरोनामुळे आतापर्यंत देशातील ९३,३७९ लोकांना प्राण गमवावे लागले आहेत. सध्याच्या घडीला महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेले राज्य आहे. शुक्रवारी राज्यात १७,७९४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर ४१६ जणांचा मृत्यू झाला. राज्यात एकूण कोरोना संक्रमितांची संख्या १३,००,७५७ वर पोहोचली आहे.