जळगाव (प्रतिनिधी) मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात नवीन कोरोनाबाधितांपेक्षा कोरोना मुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक समोर येत आहे. जिल्ह्यात आज नव्याने ४१२ रूग्ण आढळून आले असून ०७ रूग्णांचा आज मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यात ५४१ रूग्णांनी कोरोनावर मात करत घरी परतले आहेत.
तालुका निहाय आजची आकडेवारी
जिल्ह्यातील तालुक्यांचा विचार केला असता, जळगाव शहर- ६२ , जळगाव ग्रामीण- ०८, भुसावळ-५५; अमळनेर-३४; चोपडा-७० ; पाचोरा-२१; भडगाव-०४; धरणगाव-०५; यावल-२८; एरंडोल-२९; जामनेर-१७; रावेर-०९ ; पारोळा-०७ ; चाळीसगाव-३२; मुक्ताईनगर-०१ ; बोदवड-०७ आणि इतर जिल्ह्यांमधील ०९ असे एकुण ४१२ रूग्ण आढळून आले आहेत.
शहर निहाय एकूण आकडेवारी
जळगाव शहर- १०६६०, जळगाव ग्रामीण-२३४५; भुसावळ-३०८६ ; अमळनेर-४०७२, चोपडा-३९९७; पाचोरा-२१ ; भडगाव-१७७६ ; धरणगाव-२०८१; यावल१५८३; एरंडोल-२९, जामनेर-३२५८; रावेर-१९४९ ; पारोळा-२३९२ ; चाळीसगाव-३०४१; मुक्ताईनगर-१२५८, बोदवड-७६७ व दुसर्या जिल्ह्यांमधील ३७१ असे एकुण ४७,१५४ रूग्ण आढळून आले आहेत. तर आजच्या रिपोर्टनुसार जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची एकूण संख्या ४७ हजार १५४ इतकी झालेली आहे. यातील ३८,०९३ रुग्ण बरे झाले आहेत. यात आजच ५४१ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आज ०७ मृत्यू झाले असून मृतांचा एकुण आकडा ११६२ इतका झालेला आहे.
दरम्यान, आज ५७१ रूग्ण बरे झाले असून आजवर बरे होणार्यांची संख्या ३८,०९३ इतकी झाली आहे. तर आज ०७ मृत्यू झाल्याने एकूण मृतांचा आकडा ११६२ वर पोहचला आहे. सध्या जिल्ह्यातील कोरोनाचे सक्रीय रूग्ण ७८९९ इतके आहेत. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.