जळगाव (प्रतिनिधी) शनिपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत मेस्को माता मंदिर परिसरात बेकायदेशीरपणे गावठी दारु विकरणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनिपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत मेस्को माता मंदिर परिसरात बेकायदेशीरपणे गावठी दारु विकली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार आज (रविवार) शांताराम पुंडलिक महाजन (रा. मेस्कोमाता मंदिर परिसर) याच्यावर पोलिसांनी रविवारी कारवाई केली. या प्रकरणी अनिल कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.हे.कॉ. हकीम शेख, दिनेशसिंग पाटील हे तपास करीत आहेत.