जळगाव (प्रतिनिधी) दोन वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार केलेला गौरव भरत कुंवर (रा. कासमवाडी, जळगाव) याला एमआयडीसी पोलिसांनी गुरुवारी रात्री शहरातून अटक केली आहे.
यासंदर्भात अधिक असे की दोन वर्षासाठी शहरातून हद्दपार असलेला गौरव कुंवर हा शहरात असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, सहाय्यक फौजदार रामकृष्ण पाटील, पो.ना. मुदस्सर काझी, पो.हे.कॉ हेमंत कळस्कर, सचिन पाटील असे रात्रीच्या गस्तीवर असलेल्या पथकाला तपासाच्या सूचना केल्या. एमआयडीसी पोलिसांचे पथक कासमवाडीत गेले असता गौरव कुंवा हा घराच्या बाहेरच बसल्याचे आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी रात्री एक वाजेच्या सुमारास त्याला ताब्यात घेतले. तसेच हद्दपार असताना तू शहरात प्रवेश कसा केला? याबाबत विचारले असता त्याने शहरात येण्याची परवानगी नसल्याचे मान्य केले. यासंदर्भात पो.हे.का चंद्रकांत पाटील यांनी यांनी फिर्याद देत भरत कुंवर विरुद्ध मुंबई पोलीस कायदा कलम १४२ प्रमाणे फिर्याद नोंदवली आहे. पुढील तपास साहेब फौजदार अतुल वंजारी हे करत आहे