जळगाव (प्रतिनिधी) ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल नुकतेच लागले आहे. जिल्ह्यात बहुतांश सर्व ग्रामीण भागात निवडणुकीच्या निकालनंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. उमाळा (ता.जळगाव) येथे दोन गटात तलवार हल्ला झाला. यात दोन जण गंभीर जखमी झाले आहे. जखमींना तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले.
तालुक्यातील उमाळा येथे विजयी (वार्ड. क्र.२) महिला उमेदवार मंगला रघुनाथ चव्हाण यांचे जेठ प्रकाश साहेबराव चव्हाण (वय-४५) यांना त्यांचे प्रतिस्पर्धी पाटील गटातील नातेवाईकांनी आमच्याकडे खुन्नसने बघतो या किरकोळ कारणावरुन शिवीगाळ करुन दमदाटी केली. थोड्याच वेळात शंकर बाबुराव पाटिल हे भाऊबंदकीतील तब्बल १३-१४ लोकांसह हातात लाठ्याकाठ्या तलवारी घेवुन अंगावर धावुन आले. यात प्रकाश साहेबराव चव्हाण, दुसर्ा गटातील भिमराव झिपरु पाटील जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हाणामारीच्या घटनेनंतर तत्काळ पोलीस अधीकारी उमाळा गावात दाखल झाले, जमावाला शांत करत ग्रामस्थांची समजुत काढत असतांना गावातील काही टोळक्यांने गोंधळ घातल्याचे समोर आले. जखमींनी दिलेल्या तक्रारींवरुन एमआयडीसी पोलिसांत प्राणघातक हल्ला, तसेच जमाव एकवटल्या प्रकरणीजखमींच्या जबाबावरुन परस्पर विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आला आहे.
यात संशयीत ग्रामस्थापैकी काहींना अटकही करण्यात आली आहे.