TheClearNews.Com
Wednesday, October 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

vijay waghmare by vijay waghmare
February 19, 2026
in जळगाव, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव प्रतिनिधी : ग्राहकांना अचूक बिलासोबत विविध सुविधा उपलब्ध करून देणारे ८७.५७ लाख अत्याधुनिक स्मार्ट मीटर बसवून महाराष्ट्राने देशात प्रथम क्रमांक मिळविला असून राज्याच्या या यशात महावितरणची ८५.८५ लाख स्मार्ट मीटरसह प्रमुख कामगिरी आहे, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात ऊर्जा परिवर्तन चालू आहे. सौर कृषी पंप बसविण्यासह विविध बाबतीत महाराष्ट्राने देशात ऊर्जा क्षेत्रात प्रथम क्रमांक मिळविला आहे. आता स्मार्ट मीटर बसविण्यातही महाराष्ट्र राज्य पहिल्या क्रमांकावर आले आहे.

READ ALSO

जुन्या वादाचा भडका गणेश नगरमध्ये गोळीबार; तरुण गंभीर

कृषिपंपांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण प्रत्येक जिल्ह्यात ‘मिशन मोड’वर

शंभर टक्के अचूक बिल, ग्राहकांना दर तासाला मोबाईलवर विजेचा वापर समजण्याची सुविधा, सवलतीच्या वीजदराच्या काळात अधिक वीजवापराची उपकरणे वापरण्याचे नियोजन करणे व विजेचा वापर नियंत्रणात ठेवण्याची संधी असे अनेक लाभ असलेले स्मार्ट मीटर महावितरणकडून मोफत बसविण्यात येत आहेत. स्मार्ट मीटर बसविलेल्या घरगुती वीज ग्राहकांना दिवसाच्या वीज वापराबद्दल प्रती युनिट ८० पैसे टीओडी सवलतही देण्यात येत आहे. त्याच प्रमाणे औद्योगिक आणि वाणिज्यिक वीज ग्राहकांनाही सकाळी ९ ते सायंकाळी ५ या कालावधीतील वीज वापरासाठी वीजदरात सवलत देण्यात येत आहे. राज्यात ९ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी या कालावधीत स्मार्ट मीटर जनजागृती पंधरवडा साजरा करण्यात येत आहे.

स्मार्ट मीटर बसविण्याच्या बाबतीत दि. १० फेब्रुवारीपर्यंतच्या ताज्या आकडेवारीनुसार ८७.५७ लाख स्मार्ट मीटरसह महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर असून बिहार (८६.४४ लाख) व उत्तर प्रदेश (८२.७५ लाख) ही राज्ये अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर आहेत.

विजेचा वापर कोणत्या वेळेला झाला त्यानुसार वीजदरात सवलत देण्याला टाईम ऑफ डे (टीओडी) सवलत म्हणतात. स्मार्ट मीटरमध्ये अशा प्रकारे वेळेनुसार वीजवापर मोजण्याची सुविधा आहे व ग्राहकांनाही त्यांच्या मोबाईल फोनमधील ॲपमध्ये दर तासाला आपल्या घरात अथवा कार्यालयात किती वीज वापर होत आहे, हे समजते. स्मार्ट मीटरमुळे घरगुती ग्राहकांनाही टीओडी सवलत सुरू केली आहे. राज्यातील ५४ लाख ४२ हजार घरगुती ग्राहकांना जुलै २०२५ ते जानेवारी २०२६ या सात महिन्यांच्या मासिक वीजबिलामध्ये तब्बल ५१ कोटी ४२ लाख रुपयांचा लाभ झाला आहे. याखेरीज या कालावधीत लघुदाब वर्गवारीतील औद्योगिक ग्राहकांना १०६ कोटी ८९ लाख रुपये, वाणिज्यिक ग्राहकांना ४३ कोटी रुपये, सार्वजनिक पाणीपुरवठ्यासाठी ७ कोटी ३० लाख रुपये तर अन्य ग्राहकांना ६ कोटी ७० लाख रुपये टीओडी सवलत लाभ झाला आहे. याची एकूण रक्कम २१५ कोटी ३५ लाख रुपये होते. उच्चदाब ग्राहकांना या कालावधीत दिवसाच्या वीजवापराबद्दल १३४९ कोटी रुपयांचा टीओडी लाभ मिळाला असून त्यामध्ये औद्योगिक ग्राहकांचा वाटा ११०५ कोटी रुपये आहे.

स्मार्ट मीटर बसविलेल्या ग्राहकांनी मोबाईल फोनमध्ये ॲप डाऊनलोड करून त्यामध्ये आपला वीजवापर नियमित तपासावा, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

स्मार्ट मीटरच्या बाबतीत स्वयंचलित पद्धतीने वीजवापराचे रिडींग नोंदविले जाते. त्यामुळे ग्राहकाला वीजवापराचे अचूक बिल मिळते. राज्यात स्मार्ट मीटरचा वापर वाढत आहे व त्याचबरोबर बिलिंगच्या तक्रारी कमी होत आहेत. राज्यात बिलिंगच्या तक्रारीचे प्रमाण अर्धा टक्क्यावर आले आहे. त्यामुळे स्मार्ट मीटरमुळे वीजबिल वाढते या तक्रारीत तथ्य नसल्याचे स्पष्ट होते.

स्मार्ट मीटरमुळे वीजदरात वाढ होईल, असाही एक गैरसमज निर्माण झाला होता. तथापि, राज्यात स्मार्ट मीटर बसविण्यास सुरुवात केल्यानंतर महावितरणने पंचवार्षिक वीजदर निश्चितीसाठी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे दाखल केलेल्या याचिकेत वीजदर कमी करण्यासाठी परवानगी मागितली आहे. त्यामुळे ग्राहकांना स्मार्ट मीटर मोफत मिळण्यासोबतच त्याचा अप्रत्यक्ष बोजाही पडणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज्यात सर्व विद्युत फीडरवर स्मार्ट मीटर बसविण्यात आले असून त्यांची संख्या ३०,१६४ आहे तर राज्यात २.८० लाख डिस्ट्रिब्युशन ट्रान्सफॉर्मर्सवर स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत. त्यामुळे वीज वितरण प्रणालीतील विजेचा नेमका वापर समजण्यास मदत होत आहे. याच्या आधारे वीज वितरण प्रणालीचे प्रभावी व्यवस्थापन करणे, वीजगळती रोखणे आणि प्रभावी एनर्जी ऑडिटसाठी मदत होणार आहे. विजेच्या मागणीचा पॅटर्न अचूक ओळखून त्यानुसार पुरवठ्याचे नियोजन करण्यासाठी ही आकडेवारी अत्यंत उपयुक्त आहे. आगामी काळात ग्राहकांना ज्या सवलती मिळतील त्या स्मार्ट मीटरमध्ये वेळेच्या आधारे झालेल्या वीजवापराच्या अचूक नोंदीच्या आधारावर असतील. त्यामुळे ग्राहकांकडे स्मार्ट मीटर असणे गरजेचे आहे.

स्मार्ट मीटरचे लाभ –
• शंभर टक्के अचूक बिल
• ग्राहकाला दर तासाला मोबाईलवर वीजवापर समजतो
• दिवसाच्या वीजवापरसाठी वीजदरात टीओडी सवलत
• ग्राहकाला वीज वापरावर नियंत्रण ठेवणे आणि वापराचे नियोजन करण्याची सुविधा

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जुन्या वादाचा भडका गणेश नगरमध्ये गोळीबार; तरुण गंभीर

October 14, 2026
जळगाव

कृषिपंपांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण प्रत्येक जिल्ह्यात ‘मिशन मोड’वर

October 13, 2026
गुन्हे

घरफोडी करणारा चोरटा गजाआड

October 13, 2026
जळगाव

चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेत आर. आर. विद्यालयाचा उत्स्फूर्त सहभाग

October 13, 2026
जळगाव

आर. आर. विद्यालयात अभिजात मराठी भाषा सप्ताह उत्साहात संपन्न

October 13, 2026
जळगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास; युवानेते प्रतापराव पाटील यांच्या नेतृत्वाला युवकांची साथ!

October 12, 2026
Next Post

Today's Horoscope : आजचे राशीभविष्य 20 फेब्रुवारी 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धक्कादायक : १७ वर्षीय मुलीने युट्यूबच्या मदतीनं बाळाला जन्म देत स्वतःच कापली गर्भाची नाळ

October 28, 2021

जि. प.आदर्श शिक्षक पुरस्काराने संजय गायकवाड सन्मानित

September 7, 2022

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा शेळगावात जल्लोषात नागरिक सत्कार संपन्न !

February 8, 2025

खळबळजनक : बेपत्ता जवानाचा मृतदेह आढळला चिखली येथील विहिरीत !

May 17, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group