जामनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील टाकळी येथे ग्रामपंच्यायात निवडणुकीच्या निकालानंतर दोन गटात झालेल्या दगडफेकीत भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे. धनराज माळी (वय २५) असे मृत्यू झालेल्या भाजप कार्यकर्त्याचे नाव आहे. ही घटना मंगळवारी दुपारी घडली.
जामनेर तालुक्यातील टाकळीत ग्रामपंचायतीत भाजप विरुद्ध भाजप अशी लढत होती. निवडणुकीच्या निकालानंतर दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली. या हाणामारीत मोठी दगडफेक झाली. यात एक दगड हा धनराजच्या डोक्याला लागला. यात धानराज हा गंभीर जखमी झाला. त्याला दवाखान्यात नेण्यात आले मात्र, त्याच्या त्यापूर्वीच मृत्यू झाला होता.
निकालानंतर विजयी झालेल्या उमेदवारांनी गावात प्रवेश केल्या- केल्याच त्यांच्यावर पराभुत झालेल्या विरोधकांकडुन तुफान दगडफेक करण्यात आली. पोलीसांनी संशयीतांची धरपकड करून सुमारे २०-२५ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. गावामधे पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.