जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून आज सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यातून २२५ रूग्ण कोरोनामुक्त झाले. तर ९८ रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आले असून दोघांचा मृत्यू झाला आहे.
जळगाव शहर – ३८, जळगाव ग्रामीण- ००, भुसावळ-१३, अमळनेर-०३, चोपडा-०४, पाचोरा-०४, भडगाव-०१, धरणगाव-०१, यावल-०३, एरंडोल-००, जामनेर-०९, रावेर-११, पारोळा-००, चाळीसगाव-०४, मुक्ताईनगर-०४, बोदवड-०३, इतर जिल्ह्यातील-०१ असे एकुण ९८ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची संख्या एकुण ५२ हजार ३८८ पर्यंत पोहचली असून ४९ हजार ५७९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आज २ रुग्णांचा रूग्णाचा मृत्यू झालेला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत एकुण १२५० रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यात आता १ हजार ५५९ रूग्ण कोवीड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत.