जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून आज सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यातून २५६ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर १७८ रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आले असून दोघांचा मृत्यू झाला आहे.
जळगाव शहर – २६, जळगाव ग्रामीण- ०४, भुसावळ-११, अमळनेर-०८, चोपडा-०५, पाचोरा-१३, भडगाव-०१, धरणगाव-०५, यावल-०५, एरंडोल-०५, जामनेर-४०, रावेर-१४, पारोळा-०३, चाळीसगाव-०७, मुक्ताईनगर-३०, बोदवड-००, इतर जिल्ह्यातील-०१ असे एकुण १७८ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची संख्या एकुण ५२ हजार ६९३ पर्यंत पोहचली असून ५० हजार ०७२ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आज २ रुग्णांचा रूग्णाचा मृत्यू झालेला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत एकुण १२५४ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यात आता १ हजार ३६७ रूग्ण कोवीड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत.