अमळनेर (प्रतिनिधी) अल्पवयीन मुलगी घरात झोपली असतांना तिचे तोंड दाबून तिला मारहाण करत तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील एका गावात घडली आहे. याप्रकरणी पिता पुत्रांविरुद्ध अमळनेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुषण साहेबराव पाटील आणि साहेबराव हरचंद अशी संशयित आरोपींची नावे आहेत.
याबाबत पिडीत मुलीच्या आजीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी घरात झोपली असतांना तिचे तोंड दाबून मारहाण करत तिच्यावर भूषण हा अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करत होता. आपल्या नातीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न होत असल्याचे बघून तिच्या आजीने भूषणला प्रतिकार केला. मात्र अल्पवयीन मुलीच्या आई व आजीला मारहाण करुन तो पळून गेला. काही वेळाने भुषण व त्याचे वडील साहेबराव असे दोघे तेथे आले. त्या दोघांनी मिळून जातीवाचक गलिच्छ शिवीगाळ व मारहाण केली. याप्रकरणी अमळनेर पोलिस स्टेशनला दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलिस अधिक्षक ऋषीकेश रावले हे करत आहेत.