धरणगाव (प्रतिनिधी) कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष स्व. प्रा.व्हि.जी.पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त शहर काँग्रेसकडून आज त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
येथील इंदिरा गांधी विद्यालयात स्व. प्रा.व्हि.जी.पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तर यावेळी धरणगाव तालुक्याचे माजी अध्यक्ष मा.सुरेश भागवत, तालुका अध्यक्ष मा.रतिलाल चौधरी, प्रा.सी.के.पाटील सर,विजय जनकवार, रामचंद्र माळी,विकास लांबोळे उपस्थित होते.