धरणगाव (प्रतिनिधी) शहरासह जिल्ह्याभरात चोरीच्या दुचाकी विकणाऱ्या एका टोळीचा धरणगाव पोलिसांनी पर्दाफाश केला होता. याप्रकरणी धरणगाव पोलिसांनी अटक केलेल्या ५ आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या टोळीकडून पोलिसांनी तब्बल २० दुचाकी जप्त केल्या होत्या.
या संदर्भात अधिक असे की, बोरगाव ता. धरणगाव येथील जयेश पाटील याच्याकडे एकाच क्रमांकाच्या दोन मोटरसायकल आहे, अशी गुप्त बातमी पोलिस निरिक्षक जयपाल हीरे यांना मिळाल्याने पोउपनि अमोल गुंजाळ तसेच पो.हे.कों खुशाल पाटील, पो.ना मोती पवार, पो. कों दिपक पाटील, चा. पो.ना. गजेद्र पाटील, चा.पो.ना वसंत कोळी पोलिसांनी सदर ठिकाणी जावुन खात्री केली. मिळालेल्या गुप्त बातमी प्रमाणे संशयीतकडे मोटरसायकल मिळुन आल्याने त्याबाबत त्याची विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने भुषण विजय पाटील (रा. पळासखेडा सिम ता. पारोळा) यांचेकडुन सदर मोटरसायकल घेतली आहे असे सांगितले. तसेच त्यांने अनेक लोकांना जुन्या मोटरसायकल विक्री केल्या आहे व मोटरसायकल देतांना कागदपत्र नंतर देतो असे तो सांगत असतो अशी हकिगत सांगितली होती. त्यावरुन भुषण विजय पाटील याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. भूषण विजय पाटील याची सखोल चौकशी केल्यानंतर त्याने सागितले कि, ०९ मोटरसायकल भुषण घनराज पाटील व अमोल नाना पाटील (दोन्ही रा. शनी मंदीर चौक पारोळा ता. पारोळा) या दोन मोटरसायकल चोरांकडुन मागील एक ते दीड वर्षात वेळोवेळी १०,०००/- रुपये प्रत्येकी या प्रमाणे घेवुन समोरच्यास विक्री केल्याची कबुली दिली. त्यावरुन १) भुषण धनराज पाटील, २) अमोल नाना पाटील यांना ताब्यात घेवुन त्यांची सखोल विचारपुस केली असता त्यांनी चिंचपुरा ता. धरणगाव, चोपडा, चाळीसगाव, मालेगाव, धुळे, शिरपुर अशा अनेक ठिकाणी मोटरसायकल चोरी करुन त्या ३) मुषण विजय पाटील (रा पळासखेडा सिम ता. पारोळा), ४) जयेश रविद्र चव्हाण (रा. जवखेडा ता.अमळनेर), ५) ज्ञानेश्वर राजेद्र धनगर (रा. वर्डी ता चोपडा), ६) पंकज मधुकर खजुरे (रा. राजु गांधी नगर पारोळा), यांच्या मार्फतीने सामान्या लोकांना विक्री करण्यासाठी देत असे सांगितले. यावरुन वरील सहा आरोपीना धरणगाव पो.स्टे CCTNS NO ०५६६/२०२० भा.द.बी कलम ३७९.३४ या गुन्ह्यात अटक केली होती. यातील ५ आरोपींना आज पोउपनि अमोल गुंजाळ यांनी न्यायालयात हजर करत ५ दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. परंतु न्यायालयाने ३ दिवसांची पोलीस कोठडी दिली. दरम्यान, आरोपींकडून अॅड. संजय शुक्ला,अॅड. मनोज दवे, अॅड. उमेश पाटील यांनी काम पहिले.
















