धरणगाव (प्रतिनिधी) भाजपचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील (जळकेकर महाराज) यांनी नुकतीच जिल्ह्यातील तालुकाध्यक्षाची यादी प्रदेशाध्यक्ष मा.चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानुसार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीष महाजन,प्रदेश सरचिटणीस विजयभाऊ चौधरी, प्रदेश मुख्यालय प्रभारी तथा संघटन मंत्री रवि अनासपुरे यांच्या सूचनेनुसार नवनियुक्त तालुकाध्यक्ष नियुक्त केले. त्यानुसार धरणगाव तालुकाध्यक्षपदी पुन्हा जिजाबराव पाटील यांची फेरनिवड करण्यात आली आहे.
भारतीय जनता पार्टीत या निर्णयामूळे आनंददायी वातावरण आहे.यानियुक्ती साठी जिजाबराव पाटील यांनी सर्व वरीष्ठ नेत्यांचे आभार मानले. त्याचबरोबर जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील जळकेकर महाराज भाजपचे जेष्ठ नेते सुभाष अण्णा पाटील, पी.सी.आबा पाटील,विधानसभा निवडणूक प्रमुख चंद्रशेखर दादा अत्तरदे,शिरीषआप्पा बयस, जिल्हाउपाध्यक्ष अँड संजयभाऊ महाजन यांचे देखील आभार मानले.
















