धुळे (प्रतिनिधी) शहरानजीक अवधान गावातील एकाच कुटुंबातील पाच जणांनी विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यामुळं प्रचंड खळबळ उडाली आहे.
शिरपूर तालुक्यातील दहिवद येथील गणेश गोपाळ (४२) हे धुळे एमआयडीसीत कामाला आहेत. अवधान येथे दौलत नगरात ते परिवारास वास्तव्यास आहेत. सोमवारी सायंकाळी स्वत: गणेश गोपाळ, पत्नी सविता गोपाळ (३५), मुलगी जयश्री गोपाळ (१४), मुलगा गोविंदा गोपाळ (१२) आणि भारत पारधी (२४) यांनी विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
ही घटना शेजारच्यांच्या लक्षात आली. त्यांनी तात्काळ पोलिसांना कळविले. मोहाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाचही जणांना हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. दरम्यान, आत्महत्येच्या पप्रयत्नाचे कारण समजू शकलेले नाही. परंतु या घटनेमुळे धुळे जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडालेली आहे.