जळगाव (प्रतिनिधी) आज देशातील बेरोजगारीची स्थिती भयंकर आहे. करोड युवक बेरोजगार आहेत. सरकारी कंपन्या विकल्यामुळे तरुण बेरोजगार होत आहेत. भविष्यात यापेक्षाही बिकट परिस्थिती होणार आहे. त्यामुळे युवकांना रोजगार कोण देणार ?, असा सवाल करत पंतप्रधान मोदी यांनी युवकांना रोजगार द्यावा, अन्यथा राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रीय युवक सचिव प्रियंका सानप केली आहे. त्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होत्या.
जिल्हा काँग्रेसतर्फे ‘रोजगार दो’ मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना सानप म्हणाल्या की, युथ कॉंग्रेसद्वारा सुरु करण्यात आलेले ‘रोजगार दो’ अभियाना अंतर्गत राहुल गांधी मोदी सरकारला व्हिडीओ संदेशच्या माध्यमातून प्रश्न विचार आहेत. मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे आज कोरोडो युवक बेरोजगार झाले आहेत. ही परिस्थिती बदल्यण्यासाठी प्रामाणिकपणे पक्षाचे काम करा, पद शोभेसाठी मिरवू नका, काम करायचे असेल तरच पद घ्या, अन्यथा पदे सोडा असा आपल्या राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांचा संदेश असल्याचेही सानप यांनी सांगितले. यावेळी मोदी हे व्यापारी आहे, ते देशात व्यापार करीत आहे. सरकारी संस्था विकत असून मोदी अदानी, अंबानीला विकत आहेत.तरुणांना रोजगार कसा देणार ? असा सवाल आपल्या मनोगतातून युवक अध्यक्ष प्रा. हितेश पाटील यांनी उपस्थित केला. या मेळाव्याला जिल्हा युवक अध्यक्ष प्रा. हितेश पाटील, प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस मुक्तदीर बाबा देशमुख, दिपक राजपूत, पराग घोरपडे, नीरज बोराखेडे,अंबादास गोसावी, प्रवीण पाटील, वसीम जनाब, धनंजय शिरीष चौधरी, इमरान खान, किरण पाटील, इमरान खान, अनिल राऊत, संदिप पाटील, मुजीब पटेल आदी उपस्थित होते.