नवी दिल्ली (वृत्तसंस्था) निवडणूक आयोगाकडून आज दुपारी १२:३० वाजता दिल्लीतील विज्ञान भवनमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे बिहार विधानसभा निवडणुकांच्या तारखा थोड्याच वेळात घोषित होण्याची शक्यता आहे.
ख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी बिहारमध्ये विधानसभेची निवडणूक वेळेवरच घेतली जाईल याचा पुनरुच्चार केला आणि निवडणूक आयोग कोरोना विषाणूची परिस्थिती नजरेसमोर ठेवून तयारी करीत आहे व ती करताना आवश्यक ती खबरदारीही घेत आहे, असे सांगितले होते. त्यानंतर आता आज बिहार विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजणार आहे. निवडणूक आयोगाकडून आज दुपारी १२:३० वाजता दिल्लीतील विज्ञान भवनमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. विधानसभेच्या २४३ जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीसाठी तारखा घोषित होणार आहेत. बिहार विधानसभेचा कार्यकाळ २९ नोव्हेंबरला संपतो आहे. त्यामुळे नवीन सरकार हा कार्यकाळ संपण्याआधी स्थापन होणे गरजेचे आहे.