जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यातील मुख्य संशयित सुनील झंवर आणि अवसायक जितेंद्र कंडारे यांच्या घरासह इतर ठिकाणी आज पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने नोटीसी चिकटवल्या आहेत. पुढील तीस दिवसात हे दोघे संशयित आरोपी हजर न झाल्यास त्यांना फरार घोषित करण्यात येणार आहे. याबाबत न्यायालयाने नुकतेच आदेश दिले होते. त्या अनुषंगाने आज या नोटीसी बजावण्यात आल्या आहेत.
बीएचआर प्रकरणात फौजदारी संहिता तरतुदीनुसार सुनील झंवर आणि जितेंद्र खंडारे यांच्या विरुद्ध यापूर्वी स्टॅंडिंग वॉरंट निघाले होते. परंतू तरी आरोपी मिळून न आल्याने या आरोपींविरुद्ध पुणे आर्थिक गुन्हे शाखेने कारवाई सुरू केली असून या संदर्भात पुणे विशेष कोर्टात जिल्हा न्यायमूर्ती एस.एस.गोसावी यांनी सुनील झंवर व जितेंद्र खंडारे यांना कोर्टात मुदतीत हजर न झाल्यास फरार घोषित करण्याबाबत घोषणापत्र प्रसिद्ध करण्यासाठी आदेश केले नुकतेच दिले होते. त्यानुसार आज शहरातील झंवर, कंडारेच्या घरासह काव्यरत्नावली चौक,टाँवर चौक, शहर पोलीस स्थानक आदी ठिकाणी नोटीसी चिकटवल्या असल्याचे कळते. तसेच या नोटीसींमध्ये खालील प्रकारे मजुकर आहे.
आरोपी व्यक्तीला उपस्थित राहण्यासाठी फर्माविणारी उद्घोषणा
ज्या अर्थी माझ्यापुढे अशी फिर्याद दाखल करण्यात आली आहे की, सुनील देवकीनंदन झंवर (रा.प्लॉट नं 11 सुहास कॉलनी, जयनगर, साई बंगला जळगाव) याने भारतीय दंड संहितेचे कलम 406, 409, 464, 465, 468, 471, 474, 120 ब व 34 व एमपीआयडी 1999 चे कलम 3 शिक्षा पात्र असलेला अपराध केला आहे. (किंवा त्याने तसा केल्याचा संशय आहे). त्यावर काढलेल्या अटक वारंटवर आरोपी उक्त नामे सुनील देवकीनंदन झंवर हा सापडू शकत नाही, असे प्रती निवेदन करण्यात आले आहे. व त्यावर ती आरोपी सुनील झंवर हा फरारी झाला आहे किंवा उक्त वारंटची बजावणी टाळण्यासाठी स्व:ताला लपवित आहे, असे मला समाधानकारकरीत्या दाखविण्यात आले आहे. त्या अर्थी याद्वारे अशी उद्घोषणा करण्यात येत आहे की, उक्त आरोपी नामे सुनील झंवर याने १० मार्च २०२१ रोजी येथे या न्यायालयापुढे किंवा माझ्या समोर फिर्यादीला उत्तर देण्यासाठी उपस्थित राहणे आवश्यक आहे. दरम्यान, या नोटीस वर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश पुणे एस एस गोसावी यांची स्वाक्षरीसह शिक्का आहे.
आरोपी व्यक्तीला उपस्थित राहण्यासाठी फर्माविणारी उद्घोषणा
ज्या अर्थी माझ्यापुढे अशी फिर्याद दाखल करण्यात आली आहे की, जितेंद्र गुलाबराव कंडारे (रा. घर नं 149, संभाजी नगर, हमालवाडा शिवाजी नगर, जळगाव) याने भारतीय दंड संहितेचे कलम 406, 409, 464, 465, 468, 471, 474, 120 ब व 34 व एमपीआयडी 1999 चे कलम 3 शिक्षा पात्र असलेला अपराध केला आहे. (किंवा त्याने तसा केल्याचा संशय आहे). त्यावर काढलेल्या अटक वारंटवर आरोपी उक्त नामे जितेंद्र गुलाबराव कंडारे हा सापडू शकत नाही, असे प्रती निवेदन करण्यात आले आहे. व त्यावर ती आरोपी जितेंद्र कंडारे हा फरारी झाला आहे किंवा उक्त वारंटची बजावणी टाळण्यासाठी स्व:ताला लपवित आहे, असे मला समाधानकारकरीत्या दाखविण्यात आले आहे. त्या अर्थी याद्वारे अशी उद्घोषणा करण्यात येत आहे की, उक्त आरोपी नामे जितेंद्र कंडारे याने १० मार्च २०२१ रोजी येथे या न्यायालयापुढे किंवा माझ्या समोर फिर्यादीला उत्तर देण्यासाठी उपस्थित राहणे आवश्यक आहे. दरम्यान, या नोटीसवर देखील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश पुणे एस एस गोसावी यांची स्वाक्षरीसह शिक्का आहे.