जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यातील संशयित आरोपी प्रकाश वाणीचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने आज फेटाळून लावला आहे. दरम्यान, याआधी कुणाल शहाचा अटकपूर्व जामीन अर्ज देखील न्यायालयाने फेटाळून लावला होता.
भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट सहकारी पतसंस्थेचा अव्यवसाय जितेंद्र कंडारे, प्रकाश वाणी, कुणाल शहा, सुनील झंवर, महाविर जैन, सुजित वाणी, धरम साखला, योगेश साखला, विवेक ठाकरे, माहेश्वरी व इतरांनी एकमेकांच्या संगनमताने संस्थेत मोठ्या प्रमाणात अपहार केल्याचे पोलीस तपासात समोर आले होते. दरम्यान, या घोटाळ्यातील माहेश्वरी, सुनील झंवर, जितेंद्र कंडारे, प्रकाश वाणी, कुणाल शहा, योगेश साखला हे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेली नाहीत. यातील कुणाल शहा याचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने आधीच फेटाळून लावलेला आहे. या सर्वांच्या मागावर पोलीस आहेत. या संशयित शोधार्थ राज्यभरात ३ पथके रवाना करण्यात आली आहेत. दरम्यान, फॉरेंसिक ऑडिटमधून संशयित आरोपींविरुद्ध भक्कम पुरावे मिळाले आहेत. त्यामुळे आरोपींच्या अटकेचे मिशन पुन्हा जोरात सुरु झाले असून लवकरच सर्व संशयितांच्या मुसक्या पोलीस आवळतील असे बोलले जात आहे. तसेच धरम सांखला, सीए महावीर जैन, सुजित वाणी आणि विवेक ठाकरेचा जामीन अर्ज देखील न्यायालयाने फेटाळून लावलेला आहे.