साकळी ता. यावल ( प्रतिनिधी ) एक लढा शेतकऱ्यांच्या हक्कासाठी म्हणून भारत बंदला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा संपूर्ण पाठिंबा असल्यामुळे त्याच्यात सामिल होण्यासाठी सर्व राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारत बंद मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे यावल तालुका अध्यक्ष प्रा. मुकेश येवले यांनी केले आहे.
आपल्या देशाचे नेते शेतकर्यांचे कैवारी मा.खा. शरदचंद्रजी पवारसाहेब यांचा निर्णय व प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटील व जिल्हा अध्यक्ष भैयासो. रविंद्र पाटील याच्यां आदेशाने दि. ८ रोजी सकाळी १० वा. -टी पाँईट यावल शहर येथे हजर राहुन भारत बंद मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन सर्व कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे यावल तालुका अध्यक्ष प्रा. मुकेश येवले यांनी केले आहे.