नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कोरोना लशी विदेशात पाठवल्याच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात दिल्लीत ठिकठिकाणी पोस्टर लावण्यात आले आहेत. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत २१ ठिकाणी गुन्हे दाखल केले आहेत. तर १७ जणांना अटक केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील ‘ते’ पोस्टर शेअर करत मलाही अटक करा, असे आव्हान पंतप्रधान मोदींना दिले आहे.
कोरोना लशींवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात दिल्लीत ठिकठिकाणी पोस्टर लावण्यात आले आहेत. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत २१ ठिकाणी गुन्हे दाखल केले आहेत. तर १७ जणांना अटक केली आहे. याच मुद्द्यावरून आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मलाही अटक करा, असे आव्हान देत पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये “मोदी जी, हमारे बच्चों की व्हॅक्सिन विदेश क्यों भेज दिया?” असा मजकूर आहे. तर राहुल गांधी यांनी आपला प्रोफाईल फोटोवरही पोस्टर ठेवलं आहे. राहुल गांधी यांच्यानंतर लगेचच काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांनीही आपलं प्रोफाईल फोटो बदलत पोस्टर ठेवलं आहे.