जळगाव (सुरेश उज्जैनवाल) आमचे मित्र आणि धनाजी नाना चौधरी महाविद्यालय फैजपूर चे प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी यांचा आज वाढ दिवस त्यानिमित्त त्याचं अभिष्टचिंतन…आणि भावी वाटचालीस शुभेच्छा….!
प्राध्यापक ते प्राचार्य असा असा तीस वर्षापेक्षाही जास्त जीवनपट विदयार्थी घडविण्या सह आधुनिक शैक्षणिकपद्धत व विधायक विचारांची गुंफण करून वाटचाल करणारे डॉ.चौधरी हे माणसं जोडण्या सह विलक्षण विनम्रता जोपासणारे एक अफलातून व्यक्तिमत्व आहे. खरं तर ते ज्या खिरोदा गावाच्या मातीतून आहे, ते गावच मुळात शैक्षणिक चळवळीचं प्रमुख केंद्र आहे. विधान सभेचे माजी अध्यक्ष लोकसेवक कै. बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांची शिकवण आणि त्यांच्या विचारांचा प्रभाव हेच डॉ.चौधरी यांच्या जडणघडण चं मुख्य स्त्रोत आहे.
चौधरी सरांच्या खडतर आयुष्य जगलेल्या पूर्वीच्या पिढ्यांची सच्छिलता पुण्याई च्या रुपानं एखाद्याच्या नशिबी येते, पण या पुण्याईचं आपल्याच आयुष्यात सोनं करून दाखविण्याचं कर्तृत्व मात्र स्वकष्टार्जितच असते आणि तेच साधण्याचा प्रयत्न चौधरी सरांनी आपल्या आता पर्यंतच्या जीवन प्रवासात केल्याचे जाणवते. पूर्वजांच्या सामाजिक पुण्याईच्या कर्तृत्वाचा वारसा सांगत आणि त्या घराण्याचा झेंडा आणखी उंचावत नेणार व्यक्तिमत्व चौधरी सर आहेत , असे म्हटल्यास ते अतिशयोक्तीचे ठरेल असं वाटत नाही.
….खडतर पण सार्थक….
चौधरी सरांची प्रारंभीक वाटचाल खडतर होती, तरी त्यांनी स्वकर्तुत्वाने प्रतिकुलतेवर मात करून आपला स्वभाव व गुण वैशिष्ट्ये यांच्या बळावर आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा समाजात निर्माण केला. विधायक विचारसरणी आणि विनम्रता यामुळे त्यांनी शिक्षण क्षेत्रात नावलौकिक प्राप्त केलाय. केवळ प्राधायकचं नव्हे तर प्राध्यापक संघटनेत ही त्यांनी वैशिष्टयपूर्ण असे काम केले आहे. कवियत्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे विद्या परिषद सदस्य, वाणिज्य व व्यवसथापन विभागाचे अधिष्ठाता म्हणून ही त्याचे कार्य अविस्मरणीय म्हणता येईल. शिक्षण क्षेत्र आणि विद्यार्थी वर्गा साठी त्यांनी केलेल्या नवीन प्रयोग आणि वैशिष्ठयपूर्ण कार्याची दखल घेत विविध पुरस्काराने ते सन्मानित केले गेले आहेत, त्यात शिक्षण क्षेत्रात मानाचा समजल्या जाणाऱ्या एज्युकेशन एक्सलन्स आणि वाणिज्य व्यवस्थापन क्षेत्राचा प्रभाकर देशमुख पुरस्कार त्यांना मिळाला आहे. अश्या या विनम्र निगर्वी आणि मानवतेस सर्वोतोपरी मान णारे प्रा.डॉ.चौधरी सर हे खऱ्या अर्थाने शैक्षणिक, सामाजिक मानबिंदू ठरतात.
जगासाठी आपण कदाचित एक शिक्षक असाल परंतु आपल्या विद्यार्थ्यांसाठी आपण एक नायक आहात! देवाचे आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहतील. वाढ दिवसा निमित्त हार्दिक शुभेच्छा…!
……एक विचार….
आयुष्यात फक्त दोनच गोष्टीमुळे तुम्ही ओळखले जाता…एक म्हणजे…तूमच्याकडे काहीही नसताना तुम्ही दाखवलेला संयम…आणि दुसरे म्हणजे…तुमच्याकडे सर्वकाही असताना तुमच्याकडे असलेली नम्रता..!
....सुरेश उज्जैनवाल, पत्रकार-जळगाव