मुंबई (वृत्तसंस्था) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पूरग्रस्त नुकसानीचा पाहणी दौऱ्याची सुरुवात सांगवी खुर्द या गावातून करणार होते. मात्र, प्रशासनाने गावकऱ्यांनाच पूल पार करुन मुख्यमंत्र्यांच्या भेटीला बोलावले. परंतू पण, ग्रामस्थ तयार नाहीत. मुख्यमंत्री गावात आले तर ठीक, नाहीतर आम्ही त्यांच्याकडे जाणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेल्यामुळे गोंधळ उडाला आहे.
उद्धव ठाकरे आपल्या दौऱ्याची सुरुवात सांगवी खुर्द या गावातून करणार होते. मात्र, प्रशासनाने गावकऱ्यांनाच पूल पार करुन मुख्यमंत्र्यांच्या भेटीला बोलावले आहे. त्यावरुन, हा वाद निर्माण झाला असून मुख्यमंत्र्यांनी गावात यावे, अशी मागणी सरपंच व ग्रामस्थांनी केली आहे. सांगवी खुर्दच्या ग्रामस्थांना मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी बोरी नदीच्या पुलावर या असे सांगितले जात आहे. स्थानीक शासकीय अधिकारी ग्रामस्थांना पुलावर या असे सांगत आहेत. पण, ग्रामस्थ तयार नाहीत. ते म्हणत आहेत मुख्यमंत्री गावात आले तर ठीक, नाहीतर आम्ही त्यांच्याकडे जाणार नाही. मुख्यमंत्र्यांना नदीच्या पुलावरून आमची पडझड झालेली घरे आणि नुकसान कसे दिसणार ? हा ग्रामस्थांचा मुद्दा आहे. गावकऱ्यांच्या मागणीनुसार मुख्यमंत्र्यांनी पुलावरुन गावात यावे. मुख्यमंत्र्यांच्या नियोजित कार्यक्रमात सांगवी खुर्द येथून सुरूवात ठरवण्यात आले आहेत. परंतू शासकीय अधिकारी आता ऐन वेळी कार्यक्रम बदलत आहेत. त्यामुळे ग्रामस्थ संतापले आहेत.