बोदवड (प्रतिनिधी) तालुक्यातील मनूर खुर्द येथील गावाजवळील पुलाचे बांधकाम गेल्या वर्षभरापासून रखडलेले होते. अनेक दिवसानंतर काम सुरु झालेय, मात्र आता बांधकामाचा दर्जा निकृष्ट असल्याची ओरड होत आहे.
तालुक्यातील मनूर खुर्द येथील गावाजवळील पुलाचे बांधकाम गेल्या वर्षभरापासून रखडलेले होते. त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास या बद्दल सचित्र वृत्त ‘ क्लिअर न्यूज ‘ ने प्रसिद्ध केले होते. त्यावेळी रेती नसल्याने कारण सांगत हे बांधकाम रखडले असल्याचा खुलासा बांधकाम विभागाने दिला होता. मात्र, लवकरच हे काम पूर्ण करण्यासाठी संबंधित ठेकेदारास सूचित करू असे सांगितले होते. बांधकाम विभागाचे सूचनेनुसार उशिरा का होईना ठेकेदाराने बांधकाम सुरू केले. मात्र, घाईत बांधकाम दर्जा मात्र ढासळला आहे. या बांधकाम दर्जाविषयी माहिती मिळाली असता या बांधकामाबाबत तपासणी केली होती का? अशी बांधकाम विभागात विचारणा केली असता बांधकाम पाहणी केली जाईल व निकषानुसार बांधकाम नसेल तर ठेकेदारास ते दुरुस्त करण्यासाठी सूचित केले जाईल असे सांगण्यात आले आहे.