धरणगाव (प्रतिनिधी) पुणे येथील ‘ऑडिओ बुक्स’ ह्या कलावंताच्या ग्रुपच्या वतीने आपल्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या राज्यस्तरीय ऑनलाईन ‘काव्य’ स्पर्धेत परमेश्वर रोकडे यांच्या कवितेला द्वितीय बक्षीस मिळाले आहे.
पुणे येथील ‘ऑडिओ बुक्स’ ह्या कलावंताच्या ग्रुपच्या वतीने आपल्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त दि. १६ सप्टेंबर रोजी एक वर्ष पूर्ण होत असल्याने त्यांनी पहिल्या वर्धापन दिनानिमित्त कवी व कथा सादरीकरण करणाऱ्या साहित्याकांसाठी खास विनामूल्य भव्य गद्य व पद्य ऑनलाईन सादरीकरण स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य व इतर राज्यातील स्पर्धकांनी सुद्धा उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवला. भरपूर स्पर्धकांच्या प्रवशिकेत नियम व अटीत बसणाऱ्या जवळ जवळ ११२ दर्जेदार स्पर्धकामधून आयोजकांनी परमेश्वर रोकडे यांच्या स्वरचित कवितेला द्वितीय क्रमांकाचे बक्षिस मिळाले. बक्षीसाचे स्वरूप डिजिटल प्रमाणपत्र व ७०० रु. किंमतीचे वाचनीय पुस्तकांचा संच आहे .त्यांच्या या यशाबद्दल स्पर्धेचे आयोजक मा. गणेश भंडारी (पुणे) तसेच त्यांच्या ग्रुपमधील साहित्यिक व कलावन्त पदाधिकारी तसेच श्री विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष हेमलाल भाटिया,उपाध्यक्ष अंकुश पाटील,सचिव प्रा.रमेश महाजन सर्व संचालक मंडळ तसेच प्राथमिकचे मुख्याध्यापक व्ही.बी.पाटील,माध्यमिकचे मुख्याध्यापक एस.एस.पाटील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी रोकडे यांचे अभिनंदन केले.काव्यस्पर्धा व कथा सादरीकरण स्पर्धेसाठी तज्ञ परीक्षक म्हणून ज्ञानेश्वर बुधवंत सर, दुशांत निमकर सर, पुंडलिक पिंपळके सर, सतीश नवले सर व आनंद शिंदे सर यांनी काम पाहिले.