साकळी ता.यावल (प्रतिनिधी) येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या एककाकडून केंद्र सरकार पुरस्कृत जन आंदोलन अभियानांतर्गत कोविड-१९ चा (covid-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपापल्या घरी राहून शपथ घेण्यात आली.
धनाजी नाना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी आर चौधरी, 18 महाराष्ट्र बटालियन एनसीसी जळगावचे समादेशक अधिकारी कर्नल प्रवीण धिमन यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेच्या एककाचे अधिकारी लेफ्टनंट डॉ राजेंद्र राजपूत यांनी त्यांच्या 45 एनसीसी कॅडेटस नी जन आंदोलन अभियानात सक्रियपणे सहभाग घेतला. त्यात सर्वप्रथम सर्वांनी आपापल्या घरी राहून शपथ घेतली. त्यात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार व स्थानिक प्रशासनाच्या सूचनांनुसार गर्दीच्या जागी जाणे टाळणे, मास्क वापरणे, परस्परांमध्ये दोन मीटर अंतर राखणे, साबणाने वारंवार हात स्वच्छ धुणे यासोबत समाजातील प्रत्येक घटकाला यासंबंधी जनजागृती करणे अशाप्रकारे प्रतिज्ञा घेण्यात आली व ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या ब्रीद अनुसार स्वतःला कोरोना पासून सुरक्षित ठेवून इतरांनाही या विषाणूच्या प्रादुर्भावापासून बचाव करण्यासाठी स्वतः जबाबदारी उचलली.
या अभियानाच्या यशस्वीतेसाठी तापी परिसर विद्या मंडळाचे अध्यक्ष मा शिरीषदादा मधुकरराव चौधरी, आमदार, रावेर विधानसभा, उपाध्यक्ष प्रा डॉ सुधाकर काशिनाथ चौधरी, उपाध्यक्ष दामोदर हरी पाटील, चेअरमन लीलाधर विश्वनाथ चौधरी, व्हाईस चेअरमन प्रा किशोर रामदास चौधरी, सचिव प्रा मुरलीधर तोताराम फिरके, सदस्य प्रा पी एच राणे, मिलिंदबापू वाघूळदे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी आर चौधरी, समादेशक अधिकारी कर्नल प्रवीण धिमन, सुभेदार मेजर कोमलसिंग, उपप्राचार्य प्रा अनिल सरोदे, उपप्राचार्य प्रा डॉ अनिल भंगाळे, उपप्राचार्य प्रा दिलीप तायडे, उपप्राचार्य प्रा डॉ उदय जगताप, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व कॅडेटस यांनी मार्गदर्शन आणि सहकार्य केले.