मुंबई (वृत्तसंस्था) जितेंद्र आव्हाडांचे गृहनिर्माण खाते एकनाथराव खडसे यांना देणार असल्याची चर्चा असताना सध्या शरद पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात बऱ्याच वेळेपासून चर्चा सुरू असलेली नुकतीच संपली आहे. आव्हाड यांची समजूत काढण्यात पवार यशस्वी ठरलेत का?, हे थोड्याच वेळात समजणार आहे.
आव्हाडांकडे गृहनिर्माण खातं आहे. ते आपलं खातं देण्यासाठी तयार नसून यासंबंधी चर्चा करण्यासाठी ते शरद पवार यांच्याकडे गेले असल्याचं सांगण्यात येत आहे. यावेळी आव्हाडांच्या चेहऱ्यावर तणाव दिसत होता. खरंतर, कृषीमंत्रीपद किंवा गृहनिर्माण मंत्रिपद खडसेंना देणार अशी चर्चा आहे. एकनाथ खडसे यांच्याकडे कृषीमंत्रिपद सोपवले जाणार, असे यापूर्वी सांगितले जात होते. मात्र, शिवसेना कृषीमंत्रिपद सोडायला तयार नाही, अशी माहिती आता पुढे येत आहेत. तसेच खडसे यांच्या मंत्रिमंडळातील समावेशासाठी स्वत:चे स्थान सोडण्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड हेदेखील अनुत्सुक असल्याचे समजते.