TheClearNews.Com
Saturday, August 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ताप आला ४ दिवसांत कमरेवर ४ वेळा इंजेक्शन दिलं ; जळगावात गँगरीननं बालकाचा मृत्यू !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 27, 2023
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील पाथरी येथे ११ वर्षीय बालकाला ताप आल्याने गावातील डॉक्टरांनी बालकाला चार दिवसात कमरेवर तब्बल चार वेळा तर एक वेळा हातावर इंजेक्शन दिले. या इंजेक्शनमुळे बालकाच्या कमरेवर सेप्टिक होऊन कमरेपासून ते मांडीपर्यंत गँगरीने बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. याप्रकरणी दीड वर्षांनी गुरुवारी बालकाच्या आईच्या फिर्यादीवरुन पाथरी गावातीलच तिन्ही डॉक्टरांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुर्वेश नाना पाथरवट असे मयत बालकाचे नाव आहे.

धरणगाव तालुक्यातील वाघळुद येथील दुर्वेश पाथरवट हा पाथरी येथे आईसोबत मामाच्या गावी राहत होता. १० ऑक्टोबर २०२१ रोजी दुर्वेशला ताप आल्याने कुटुंबियांनी त्यास पाथरी गावातीलच डॉ. स्वप्निल युवराज पाटील यांच्या दवाखान्यात नेण्यात आले होते. त्यांनी तपासून दुर्वेश यास कमरेवर एक इंजेक्शन व काही गोळ्या लिहून दिल्या. यानंतर तीन दिवसांनी पुन्हा दुर्वेश यास ताप आल्याने कुटुंबियांनी त्याला डॉ. स्वप्निल पाटील यांच्या दवाखान्यात नेले. याठिकाणी डॉ स्वप्निल पाटील नव्हते, तर डॉ. युवराज जयराम पाटील यांनी दुर्वेश यांच्या दोन्ही कमरेवर इंजेक्शन व गोळ्या लिहून दिल्या होत्या.

READ ALSO

दहावीच्या विद्यार्थ्यावर शाळेतील मुलाकडूनच चॉपरने हल्ला

स्मार्ट मीटरमधून ऑटो डिस्कनेक्ट तरीही वीजचोरी; जळगाव शहरात तीन जणांवर गुन्हे दाखल

१४ ऑक्टोबरला दुर्वेशच्या कमरेवर इंजेक्शन दिल्याच्या ठिकाणी त्रास व्हायला लागल्याने कुटुंबियांनी दुर्वेश यास गावातील डॉ सुभाष जाधव यांच्याकडे नेले. त्यांनी दुर्वेशला त्याच्या कमरेवर व हाताच्या दंडावर इंजेक्शन दिले व पुन्हा काही गोळ्या लिहून दिल्या. दुर्वेशला कमरेवर इंजेक्शन घेतल्याच्या ठिकाणी त्रास होत असल्याने दुर्वेशच्या मामाने डॉ. युवराज पाटील यांना फोनवरुन सांगितले. यानंतर डॉक्टर युवराज पाटील घरी आले. त्यांनी दुर्वेशला तपासले तसेच दवाखान्यात घेऊन या. डॉक्टर स्वप्नील पाटील हे तपासून नेमकं काय झालं ते सांगतील असं युवराज पाटील यांनी दुर्वेशच्या कुटुंबियांना सांगितलं.

दुर्वेशला दवाखान्यात नेले असता, डॉ स्वप्निल पाटील यांनी दुर्वेश यास तपासून इंजेक्शन दिल्याच्या ठिकाणी सेप्टिक झाले असावे असे सांगत त्यास पुढील उपचारासाठी जळगावातील अन्य एका खाजगी रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिला. डॉ स्वप्निल पाटील यांच्या सांगण्यानुसार कुटुंबियांनी १५ ऑक्टोंबर रोजी दुर्वेश यास उपचारासाठी जळगावात तेथे नेले. याठिकाणच्या डॉक्टरांनी दुर्वेश यास तपासले व सोनोग्राफी करण्यास सांगितले.

सोनोग्राफीनंतर दुर्वेश यास कमरेपासून मांडीपर्यंत गँगरीन झाले असून त्याची शस्त्रक्रिया करावी लागेल असे त्या खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले. त्यानुसार दुर्वेशच्या कुटुंबियांनी शस्त्रक्रिया करण्यास होकार दिला. परंतु शस्त्रक्रियेपूर्वी रक्ताचे सॅम्पल घेत असताना दुर्वेशची हालचाल अचानक थांबली. दुर्वेशला जिल्हा रुग्णालयात नेले असता येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दुर्वेश यास तपासून मयत घोषित केले. याबाबत सुरुवातीला एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर आता गुरुवार, २३ मार्चला दुर्वेश याची आई प्रतिभा नाना पाथरवट यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीनुसार डॉ. स्वप्नील युवराज पाटील, युवराज गंगाराम उर्फ जयराम पाटील आणि डॉ. सुभाष जाधव यांच्याविरोधात निष्काळजीपणामुळे मुलाच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रविंद्र गिरासे करत आहेत.

दरम्यान, जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक यांनी आपल्या अभिप्रायात दुर्वेश यास इंजेक्शन देणारे पाथरी गावातील डॉ स्वप्निल युवराज पाटील, युवराज गंगाराम ऊर्फ जयराम पाटील व डॉ सुभाष जाधव यांना इंजेक्शन देण्याची परवानगी नसतानाही त्यांनी दुर्वेश यास कमरेवरती इंजेक्शन दिले आणि या इंजेक्शनमुळे दुर्वेश यास गँगरीन होवून त्याचा मृत्यू झाला असे नमूद केले होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

दहावीच्या विद्यार्थ्यावर शाळेतील मुलाकडूनच चॉपरने हल्ला

August 8, 2026
गुन्हे

स्मार्ट मीटरमधून ऑटो डिस्कनेक्ट तरीही वीजचोरी; जळगाव शहरात तीन जणांवर गुन्हे दाखल

August 7, 2026
गुन्हे

शाळांच्या आवारात मिनी मोबाईलद्वारे प्रेमाच्या जाळ्यात ओढणाऱ्यांचा भंडाफोड

August 7, 2026
जिल्हा प्रशासन

जनसामान्य सक्षमीकरण : भुसावळ येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ‘जनसमाधान बैठक’ संपन्न

August 7, 2026
गुन्हे

लग्नाचे अमिष दाखवून तीन वर्षांपासून तरुणीवर अत्याचार

August 7, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
Next Post

धरणगावच्या पौर्णिमा समीर भाटिया स्व.सुषमा स्वराज पुरस्काराने सन्मानित !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, ५ ते ११ जानेवारी २०२५

January 5, 2025

तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत पंकज माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयाचे वर्चस्व !

September 9, 2023

नवे संसद भवन, १४० कोटी भारतीयांच्या स्वप्नांचं प्रतिबिंब : नरेंद्र मोदी !

May 28, 2023

परमबीर सिंग प्रकरणाचा तपास करणारे अधिकारी सीबीआयच्या रडारवर ; सर्व अधिकाऱ्यांना पाठवणार समन्स

May 18, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group