
अमळनेर (प्रतिनिधी) – दिवाळी पाडवा निमित्ताने माजी नगरसेवक विक्रांत पाटील व नगरसेविका स्वप्ना पाटील यांनी आयोजित स्नेह मिलन कार्यक्रमात सामाजिक बांधिलकी जपत अनोखा आदर्श पाहायला मिळाला. या स्नेहमिलन कार्यक्रमात सफाई कामगार तसेच गरजु कुटुंबांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.तसेच गरीब होतकरू शालेय मुलींना सायकल वाटप करून त्यांच्या शिक्षणाला हातभार लावण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मुलींना सायकल प्रदान करण्यात आल्या,सायकल मिळताच मुलींच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.”शाळा दूर असली तरी आता शिक्षण थांबणार नाही,” अशी भावना यावेळी मुलींनी व्यक्त केली. त्यानंतर परिसरातील कुटुंबांना दिवाळी फराळाचे पॅकेट वाटप करण्यात आले.दिवाळीचा आनंद हा फक्त आपल्यापुरता नाही, तर सर्वांसोबत वाटण्यातच खरा आनंद असल्याचे मनोगत नाभिक समाजाचे नेते मधुकरराव सैदाणे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाला माजी उपनगराध्यक्ष डॉ. रामभाऊ शेलकर, माजी नगरसेवक राजाराम बडगुजर, हिंम्मतराव देसले, राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त आदर्श शिक्षक श्री राधेबाबा चौधरी, कोळी समाजाचे तालुकाध्यक्ष मधुकरराव सोनवणे, ज्येष्ठ नागरिक सोमा ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते दिपक पाटील, नितीन पाटकरी, कैलास महाजन, मुकादम तन्वीर शेख अन् परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नगरसेविका स्वप्ना पाटील यांनी मान्यवरांचे आभार मानले.या कार्यक्रमासाठी प्रविण ठाकूर, अशोक पाटील, राहुल महाजन, हितेश बारी, जयेश बडगुजर, रामकृष्ण कोळी, नीरज पाटकरी, स्वामी सैदाणे, अनिल पवार आदींनी सहकार्य केले.














