नवी दिल्ली (वृत्तसंस्था) मागच्या काही काळात या क्षेत्राने अनेक बंधनातून स्वतःला मुक्त केले आहे, मला अनेक शेतकऱ्यांची पत्रे मिळत राहतात, या क्षेत्रात कशा प्रकारे बदल होत आहेत याबद्दल ते मला माहिती देत राहतात. देशाचे कृषी क्षेत्र, आमचे शेतकरी, हे आत्मनिर्भर भारताचा आधार आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आजच्या मन की बात’ मध्ये म्हटले.
‘मन की बात’ मध्ये पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांचे अनुभव सांगत नवीन तरतुदींची माहिती दिली. अनेक शेतकऱ्यांची पत्रं येतात. मी शेतकरी संघटनांशी बोलतो. ज्यात शेतीमध्ये नवीन पैलू केसे जुळत आहेत. यामुळे शेतीत कसे बदल होत आहेत हे समोर येतंय. हरयाणाच्या सोनीपत जिल्ह्यात कंवर चौहान हे एक शेतकरी. त्यांना आधी बाजार समितीबाहेर आपली फळं आणि भाजीपाला विकण्यात खूप अडचणी येत होत्या. आपली फळं आणि भाजी मंडईच्या बाहेर विकत असताना बऱ्याचदा त्यांची फळं, भाज्या आणि गाड्या जप्त करण्यात आल्या. पण २०१४ मध्ये एपीएमसी कायद्यातून फळे आणि भाज्या हटवण्यात आल्या. याचा त्यांना आणि जवळपासच्या इतर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
मोदी पुढे म्हणाले की, आदरणीय गांधीजींचे विचार आणि आदर्श आजघडीला समयोचित आहेत. महात्मा गांधीजींचे आर्थिक विचार समजून घेतले असते, तर आज आत्मनिर्भर भारत अभियानाची गरज भासली नसती. गांधीजींच्या आर्थिक विचारांमध्ये भारताची चांगली जाण दिसून येते, भारताचा सुगंध दरवळत राहतो, असंही मोदी म्हणाले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, आपण सर्व लोक, नव्या पिढीला आपल्या महापुरुषांबद्दल, महान माता आणि भगिनींबद्दल कथांच्या माध्यमातून माहिती देऊ शकतो. कथाशास्त्र अधिक लोकप्रिय कसे करू शकतो, यासाठी पोषक वातावरण कशा प्रकारे तयार करता येईल, याचा विचार करून त्या दिशेने काम केले पाहिजे, असेही मोदी म्हणाले.