नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या २४ तासांत देशात ११ हजार ९०३ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर ३११ कोरोनाग्रस्तांना एका दिवसात प्राण गमवावे लागले. तसेच गेल्या २४ तासांत १४ हजार १५९ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत १४ हजार १५९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या एक लाख ५१ हजार २०९ वर पोहोचली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, २५२ दिवसांनी सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. देशात आतापर्यंत ३ कोटी ३६ लाख ९७ हजार ७४० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
राज्यातील स्थिती
कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. राज्यात आज १,०७८ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर १ हजार ०९५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत ६४ लाख ५३ हजार ५८१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.५९ टक्के आहे. राज्यात काल ४८ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर २.१२ टक्के झाला आहे.