जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज १६० कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहे. तर दुसरीकडे २८१ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आज एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.
जळगाव शहर – ३४, जळगाव ग्रामीण-०७, भुसावळ-२४, अमळनेर-०४, चोपडा-२४, पाचोरा-०२, भडगाव-०१, धरणगाव-०६, यावल-००, एरंडोल-०१, जामनेर-२८, रावेर-०२, पारोळा-०१, चाळीसगाव-०८, मुक्ताईनगर-१३, बोदवड-०१, इतर जिल्ह्यातील-०४ असे एकुण १६० रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या १ लाख ५० हजार ९८२ पर्यंत पोहचली असून १ लाख ४६ हजार ४१२ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. त्यानुसार आतापर्यंत २५८७ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर १९८३ रुग्ण सध्या उपचार घेताय.