मुंबई वृत्तसंस्था महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर बनल्याने गेल्या काही दिवसांत सरकारने असंख्य जीआर मंजूर करून घेतले आहेत. याप्रकरणी विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी राज्यपालांना पत्र लिहिले होते. यावरच राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिलं आहे. सरकारकडून 3 दिवसात मंजूर झालेल्या जीआरची माहिती राज्यपालांनी मागवली आहे. २२ ते २४ जून दरम्यानच्या जीआरची माहिती राज्यपालांनी मुख्य सचिवांकडून मागवली आहे.
राज्य सरकारने जीआर मंजूर करण्याचा चांगला सपाटाच लावला. आता राज्यपालांनी या घाई-घाईने मंजूर केलेल्या जीआर बाबत मुख्यमंत्र्यांकडे विचारणा केली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी राज्याच्या मुख्य सचिवांना याविषयी पत्र लिहिलं आहे. सरकारकडून ३ दिवसात मंजूर झालेल्या जीआरची माहिती राज्यपालांनी मागवली आहे. २२ ते २४ जून दरम्यानच्या काळात एवढे जीआर कसे मंजूर करण्यात आले. आता राज्याचे मुख्य सचिव राज्यपालांना या जीआरबाबत काय माहिती देतात, हे पाहणं महत्त्वाचं आहे.
मुख्यमंत्रीपद अस्थिर झाल्यानंतर कधी नव्हे इतके महाविकास आघाडी सरकार निर्णय घ्यायला लागले.२२ ते २४ जूनच्या काळात महाविकास आघाडीकडून अनेक जीआर मंजूर करण्यात आले आहेत. २४ जून रोजी ५८ जीआर, २३ जून रोजी ५७ जीआर, २२ जून रोजी ५४ जीआर, २१ जून रोजी ८१ जीआर, २० जून रोजी ३० जीआर मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे एवढे जीआर अवघ्या चार दिवसांत कसे काय मंजूर होऊ शकतात, असा प्रश्न राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विचारला आहे. त्यामुळे सरकारकडून ३ दिवसात मंजूर झालेल्या जीआरची माहिती राज्यपालांनी राज्याचे मुख्य सचिवांकडून मागवली आहे.