जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज १०१२ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे ९९५ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आज तेवीस रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जळगाव शहर – १६३, जळगाव ग्रामीण-५६, भुसावळ- ४९, अमळनेर-४६, चोपडा-५३, पाचोरा-५९, भडगाव-३३, धरणगाव-२७, यावल-२६, एरंडोल-१००, जामनेर-५९, रावेर-९६, पारोळा-३७, चाळीसगाव-६४, मुक्ताईनगर-१७, बोदवड-१२०, इतर जिल्ह्यातील-०७ असे एकुण १०१२ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या ११८ हजार ९२८ पर्यंत पोहचली असून १०५ हजार ९०१ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज तेवीस रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानुसार आतापर्यंत २१२२ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर १०९०५ रुग्ण सध्या उपचार घेताय.