जळगाव (प्रतिनिधी) पुढे तपासणी सुरु असल्याची बताावणी करीत वृद्धाला पाठलाग करणाऱ्यांनी थांबवले. त्यांना गळ्यातील १५ ग्रॅमची सोन्याची चैन व १० ग्रॅमच्या दोन अंगठ्या हातचालाखी करीत चोरुन नेले. ही घटना सोमवारी दुपारच्या सुमारास डीमार्ट समोर घडली. याप्रकरणी पोलीसात कुठलीही नोंद करण्यात आलेली नव्हती.
शहरातील एका भागात राहणारे वृद्ध दुचाकीने सिंधी कॉलनीकडून डीमार्टकडे जात होते. दरम्यान, एका दुचाकीवरील दोन जणांनी त्यांचा पाठलाग करीत त्यांना डीमार्ट समोर थांबवले. त्यातील एकाने पुढे तपासणी सुरु असून तुम्ही गळ्यातील चैन आणि बोटातील अंगठ्या काढून तुमच्याजवळ असलेल्या रुमालात ठेवा असे सांगितले. त्यानुसार त्या वृद्धाने त्यांच्या गळ्यातील १५ ग्रॅमची सोन्याची चैन आणि पाच ग्रॅमच्या प्रत्येकी दोन अंगठ्या काढून रुमाला त्या इसमांच्या हातात दिली. त्या दोघांनी तो रुमालात ठेवण्याचा बहाना केला.
रुमाल उघडताच दिसले दगड
दुचाकीवरुन आलेल्या त्या दोघ इसमांनी वृद्धाजवळील सोन्याची चैन आणि अंगठ्या ठेवलेला रुमाल हातचाखाली करीत बदवला. काही वेळानंतर ते वृद्ध डि मार्टमध्ये गेले, त्यांनी रुमाल उघडून बघितला असता, त्यांना त्यामध्ये दगड असल्याचे दिसून आले.
पोलिसांकडून वृद्धाची चौकशी
त्या संबंधित इसमांनी आपली फसवणुक केल्याचे समजताच वृद्धाने तात्काळ घटनेची माहिती रामानंद नगर पोलीसांना दिली. पोलीस कर्मचारी घटनास्थळी गेले, मात्र ही घटना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्यामुळे एमआयडीसी पोलिसांनी याप्रकरणाची चौकशी केली. परंतु याप्रकरणी पोलीस ठाण्यात कुठलीही नोंद करण्यात आलेली नव्हती.
















